'तो' ऑडिओ क्लिप शहीद कोस्तुभ राणे यांच्या पत्नीचा नाही

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लढताना शहीद झालेले मेजर कौस्तुभ राणे यांच्या पत्नीच्या नावाने सोशल मीडियावर खोटी आॅडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 12, 2018 11:11 AM IST

'तो' ऑडिओ क्लिप शहीद कोस्तुभ राणे यांच्या पत्नीचा नाही

मुंबई, 12 ऑगस्ट : काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लढताना शहीद झालेले मेजर कौस्तुभ राणे यांच्या पत्नीच्या नावाने सोशल मीडियावर खोटी आॅडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या व्हायरल क्लिपमुळे सगळीकडून संताप व्यक्त केला जात आहे. यासंबंधित समतानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. ठाणे ग्रामीण पोलिसांनी तपास सुरू करीत आहेत. ही क्लिप फॉरवर्ड करू नका, असं आवाहनबी पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

शिवाय, शहीद कौस्तुभ यांच्या नावे निधी जमवण्याचे प्रकार समोर आले आहेत. कौस्तुभ यांच्या मामी वर्षा जाधव यांनी शहीद पत्नी व कुटुंबीयांना मनस्ताप होईल, असे काही करू नका, असे आवाहन केले आहे. त्यामुळे तुमच्याकडे जर असा कोणती ऑडिओ क्लिप आली तर ती फॉरवर्ड करू नका.

सोशल मीडियावर गेल्या 2 दिवसांपासून एक 7 मिनिटांचा ऑडिओ क्लिप व्हायरल झाला आहे. या शहीद कौस्तुभ राणे यांच्या पत्नीने मनोगत आहे. पण ही क्लिप खोटी आणि निंदाजनक असल्यामुळे याचा कोस्तुभ यांच्या पत्नीला मनस्ताप झाला आहे. आधीच कौस्तुभ यांच्या अशा जाण्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे आणि त्यात या सगळ्या प्रकारमुळे त्यांचा मनस्ताप वाढला आहे.

या सगळ्यावर कौस्तुभ यांच्या मावसभावाने समतानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे ही अशी खोटी ऑडिओ क्लिप कोणी व्हायरल केली याचा पोलीस आता तपास घेत आहेत. या क्लिपमध्ये कौस्तुभ यांच्या पत्नीने त्यांनी आपल्या पतीविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे हा एका शहीद जवानाच्या कुटुंबियांचा अपमान आहे. त्यामुळे वाचकहो, अशी कोणतीही क्लिप तुमच्याकडे आली तर तिला फॉरवर्ड करू नका. त्याआधी शहीद कौस्तुभ राणे यांनी आपल्यासाठी आणि आपल्या देशासाठी दिलेलं बलिदान नक्की आठवा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 12, 2018 11:11 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close