Home /News /news /

छुपेपणाने सुरू होती फडणवीसांची खलबतं; दिल्लीतून आले अन् मुंबईचं चित्रच बदललं!

छुपेपणाने सुरू होती फडणवीसांची खलबतं; दिल्लीतून आले अन् मुंबईचं चित्रच बदललं!

दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ...असं काहीसं चित्र पाहायला मिळत आहे.

    मुंबई, 28 जून : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यपालांची भेट घेतली. ठाकरे सरकार अल्पमतात असल्याने बहुमत चाचणी घेण्याची मागणी केली आहे. त्यामुळे ठाकरे सरकारच काऊंटडाऊन सुरू झालं आहे. फडणवीसांकडून तत्काळ बहुमत चाचणी घेण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात ठाकरे सरकारला बहुमत चाचणीला सामोरं जावं लागणार आहे. अशावेळी त्यांच्याकडे सुप्रीम कोर्टात जाण्याचा मार्गही खुला असेल. शिवसेनेच्या दोन गटांमध्ये भांडणं सुरू असताना दुसऱीकडे देवेंद्र फडणवीस मात्र सत्ता स्थापनेची जुळवाजुळव करीत होते. यापूर्वीही त्यांनी मध्यरात्री इंदूरमार्गे बडोद्याला जाऊन अमित शहांची भेट घेतली होती. याशिवाय एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमागे भाजपचा हात असल्याचा दावा अनेकांकडून केला जात होता. अनेक शिवसेना नेत्यांनी तर भाजपने सर्व बंडखोर आमदारांना 50 कोटी देऊ केल्याचा आरोपही केला होता. आजही देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी अमित शहा आणि जे पी नड्डा यांची भेट घेतली. या भेटीत सत्ता स्थापनेविषयी चर्चा करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. तेथून परतताच त्यांनी पक्षातील काही नेत्यांसोबत राज्यपालांची भेट घेतली आणि सरकार अल्पमतात असल्याकारणाने बहुमत चाचणीची मागणी केली. दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ.. शिवसेनेतील 40 हून अधिक नेते बंडखोरी करीत बाहेर पडले आणि आधी सुरत आणि नंतर गुवाहाटीला आहेत. 21 तारखेपासून सुरू झालेला या वादात दररोज विविध प्रकारे आरोप प्रत्यारोप केले जात आहे. दररोज एकनाथ शिंदे गटाकडूनही राष्ट्रवादी-काँग्रेससोबत सत्ता नको असल्यामागील कारणं सांगितली जात आहे. तर दुसरीकडे मुंबईतून संजय राऊत आणि आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांवर टीकास्त्र करीत आहेत या सर्व गोंधळाच्या प्रकरणात फायदा मात्र भाजपला झाल्याचं उघड आहे. भाजपकडून मौन.. राज्यात राजकीय खळबळ माजली असतानाही भाजप नेत्यांकडून मौन पाळलं जात होतं. अनेक ज्येष्ठ नेत्यांनी तर वेट अँड वॉचची भूमिका घेतली होती. आज पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाबद्दल आपली भूमिका व्यक्त केली.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: BJP, Devendra Fadnavis, Shivsena

    पुढील बातम्या