News18 Lokmat

फडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात

गृहखात्याकडून त्यांना वाय प्लस सुरक्षा व्यवस्था पुन्हा देण्यात आली होती.

News18 Lokmat | Updated On: Jan 16, 2019 05:28 PM IST

फडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात

प्रशांत बाग, प्रतिनिधी

नाशिक, 16 जानेवारी : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची सरकारनं दिलेली वाय प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था परत घेतली असून भुजबळ हे आमदार असल्यानं त्यांना फक्त एक अंगरक्षक कायम ठेवला आहे.

भुजबळ हे गृहमंत्री, उपमुख्यमंत्री असतांना मुंबईतील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी त्यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले होते. काही गुन्हेगारी टोळ्यांच्या रडारवर ते असल्याचा अहवाल असल्यानं त्यांना झेड प्लस सुरक्षा व्यवस्था सरकारनं दिली होती.

दरम्यान, बेकायदेशीर संपत्ती प्रकरणात छगन भुजबळ यांना 2 वर्ष कारागृहात जावं लागलं होतं. जामिनावर सुटल्यानंतर त्यांनी केलेल्या अर्जानुसार, गृहखात्याकडून त्यांना वाय प्लस सुरक्षा व्यवस्था पुन्हा देण्यात आली होती.

या अंतर्गत त्यांच्या घरी 4 हत्यारी पोलीस आणि सोबत 4 हत्यारी पोलीस त्यांना सुरक्षारक्षक म्हणून होते. मात्र, गेल्या 14 जानेवारीला त्यांच्या सुरक्षेत कपात केल्यानं ऐन संक्रांतीला, त्यांच्यावर संक्रांत आली अशी चर्चा आहे. दरम्यान, हा अन्याय असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

Loading...

गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ हे आपल्या आक्रमक शैलीनं पुन्हा एकदा जोरदार सभा गाजवत आहे आणि सरकारवर जोरदार आरोपही करत आहे. मात्र, 'जोपर्यंत शरीरात प्राण आहे, तोपर्यंत सत्याच्या बाजूनं बोलतच राहणार,' अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली आहे.

=========================बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 16, 2019 05:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...