FACT CHECK : पंतप्रधान मोदी देताय का बेरोजगारांना 3 हजार ५०० भत्ता? हे आहे सत्य

FACT CHECK : पंतप्रधान मोदी देताय का बेरोजगारांना 3 हजार ५००  भत्ता? हे आहे सत्य

केंद्र शासनाने बेरोजगार तरुणासाठी प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजना २०२० सुरू केली असून त्यात नाव नोंदणी केल्यानंतर तुम्हाला दरमहा 3 हजार ५०० रुपये बेरोजगारी भत्ता मिळणार...

  • Share this:

मनमाड, 12 फेब्रुवारी :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक योजनांची घोषणा केली आहे. परंतु, काही योजनांच्या नावाने फसवणूक करण्याचे प्रकार समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून  प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजना २०२० या नावाने एक लिंक व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. परंतु, सत्य परिस्थिती वेगळीच आहे.

केंद्र शासनाने बेरोजगार तरुणासाठी प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजना २०२० सुरू केली असून त्यात नाव नोंदणी केल्यानंतर तुम्हाला दरमहा 3 हजार ५०० रुपये बेरोजगारी भत्ता मिळणार असल्याचा मेसेज सध्या व्हॉटसअॅपसह इतर सोशल मीडियावर फिरत असून बेरोजगार तरुणांचा यावर विश्वास बसावा यासाठी चक्क प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या फोटोचा वापर करण्यात आलेला आहे.

मात्र, वेगवेगळ्या विभागाचे शासकीय अधिकारी,भाजपचे लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्याशी या बाबत चर्चा करून माहिती घेतली असता. केंद्र शासनाने अशी कोणतीही योजना सुरू केली नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर फिरत असलेला हा मेसेज फेक आणि खोटा असून तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे.

सध्या दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत असून रोजगार मिळावा यासाठी तरुण वर्ग धडपड करत आहे.त रुणांच्या याच गरजेचा गैर फायदा घेण्यासाठी कोणी तरी  pradhanmantri-berojgari-bhatta-yojna या नावाने वेबसाईट सुरू केली असून त्यात तुम्ही १० वी पास असला आणि तुमचे वय १८ ते ४० दरम्यान असेल तर तुम्ही या योजनेत तुमचे नावे नोंदवा. नाव नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला दर महा 3 हजार ५० रुपये बेरोजगारी भत्ता दिला जाईल. अशी पोस्ट व्हॉटसअॅप सह इतर काही सोशल मीडियावर वेगाने फिरत आहे.

या पोस्टवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा फोटो असल्यामुळे तरुणांचा साहजिकच तिच्यावर विश्वास बसू लागला आणि जो पर्यंत आपल्याला काम धंदा मिळत नाही. तोपर्यंत केंद्र सरकारकडून साडे तीन हजार रुपये बेरोजगारी भत्ता मिळणार असल्याचे पाहून तरुण वर्ग खुश झाला. मात्र, काही तरुणांना शंका आल्यामुळे त्यांनी न्यूज18लोकमत च्या प्रतिनिधीकडे येवून खातरजमा केली.

परंतु, केंद्र शासनाने सध्या तरी अशी कोणतीही योजना सुरू केल्याचे जाहीर केले नाही. भाजपचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितलं की,  वेगवेगळ्या विभागातील शासकीय अधिकारी,भाजप  आणि इतर पक्षाचे लोकप्रतिनिधी आणि भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी यांच्याशी योजनेबाबत चर्चा केली असता त्यांनी ही अशी कोणतीही योजना केंद्र सरकार तर्फे सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी या वेबसाईटवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन नितीन पांडे यांनी केलं.

त्यामुळे प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजना २०२० या नावाने सोशल मीडियावर फिरणारा मॅसेज हा फेक आणि खोटा असल्याचं स्पष्ट झालं आहे. सध्या सोशल मीडियावर फेक आणि खोटी माहिती, बातम्या मोठ्या प्रमाणात येत आहे त्यामुळे तरुण वर्गाने अशा मेसेजला बळी पडू नये त्यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे.

First published: February 12, 2020, 11:17 PM IST
Tags:

ताज्या बातम्या