मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

Fake News चा प्रताप; पायाला आली अ‍ॅलर्जी, खापर फुटलं कोरोना लशीवर

Fake News चा प्रताप; पायाला आली अ‍ॅलर्जी, खापर फुटलं कोरोना लशीवर

कोरोना लस (Corona Vaccine) दृष्टिपथात आलेलं असतानाच त्याबद्दलची चुकीची माहिती, अफवा पसरू लागल्या आहेत. त्याचा जोरदार फटका एका महिलेला बसला.

कोरोना लस (Corona Vaccine) दृष्टिपथात आलेलं असतानाच त्याबद्दलची चुकीची माहिती, अफवा पसरू लागल्या आहेत. त्याचा जोरदार फटका एका महिलेला बसला.

कोरोना लस (Corona Vaccine) दृष्टिपथात आलेलं असतानाच त्याबद्दलची चुकीची माहिती, अफवा पसरू लागल्या आहेत. त्याचा जोरदार फटका एका महिलेला बसला.

टेक्सस सिटी (अमेरिका), 10 डिसेंबर : कोरोना विषाणूच्या (Corona Virus)साथकाळात या नवीन आजाराविषयीच्या माहितीबरोबरच अनेक प्रकारच्या फेक न्यूज (Fake News), चुकीची किंवा खोटी माहिती, अफवा, आरोप आदी गोष्टी सोशल मीडियावर (Social Media) पसरू लागल्या आहेत. आता कोविड-19वरची (COVID-19) लस (Corona Vaccine) दृष्टिपथात आली असताना लसीकरणाबद्दल किंवा लसीबद्दल चुकीच्या माहितीचा पूर सोशल मीडियावर आला आहे. अमेरिकेत्या टेक्सास राज्याच्या रहिवासी असलेल्या पॅट्रिशिया शँडलर यांना त्याचा अत्यंत वाईट अनुभव आला. (Patricia Chandler)

आपल्या पायावर उठलेल्या डागांचे (Skin Blisters) फोटो शँडलर यांनी सोशल मीडियावर अपलोड केले होते. त्या डागांमागचं कारण अजून कळलेलं नाही; मात्र त्या महिलेनं फायझर-बायोएनटेक (Pfizer-BioNTech) या कंपन्यांच्या कोविड-19 लशीच्या चाचणीमध्ये (Trials) भाग घेतला होता, हे लोकांच्या लक्षात आलं. त्यामुळे पॅट्रिशिया यांनी फोटो शेअर केल्यानंतर लशीविरोधातलं वातावरण तयार होण्यास आणि त्याबद्दल राग व्यक्त करण्यास सुरुवात झाली.

लशीच्या विरोधात असलेल्या कार्यकर्त्यांनी आपल्या लसीकरणाविरोधातल्या आंदोलनात चँडलर यांच्या डागाळलेल्या पायांचे फोटो वापरले. फायझर-बायोएनटेक या कंपन्यांची लस सामान्य नागरिकांना देण्यास गेल्या आठवड्यात सुरुवात झाली आहे. अमेरिकेत अद्याप ‘एफडीए’ने त्या लसीकरणाला (Vaccination) मान्यता दिलेली नाही. लसीच्या विरोधकांचा असा दावा आहे, की चँडलर यांच्या पायांवर उठलेले डाग हा लशीचा परिणाम आहे. काही जणांनी तर चँडलर फेक न्यूज पसरवत असल्याचा आरोप केला आहे.

बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, लसीच्या चाचणी कार्यक्रमात चँडलर सहभागी झाल्या होत्या, हे खरंच आहे; मात्र त्यांना खरी लस देण्यात आली नव्हती. त्यांना प्लासिबो (Placibo) अर्थात मिठाच्या पाण्याचं छोटं इंजेक्शन देण्यात आलं होतं. लसीची चाचणी घेतली जात असलेल्या गटात काही जणांवर असा प्रयोग केला जातो. त्यामुळे संशोधकांना त्या विशिष्ट औषधाचे नेमके परिणाम आणि त्यांची तुलना करणं शक्य होतं.

चँडलर यांना पाठदुखीचा त्रास असून, त्यावरच्या उपचारांसाठी येणाऱ्या खर्चामुळे त्या आधीच अडचणीत आहेत. त्यांना मदत म्हणून एका नातेवाईकाने GoFundMe page for Patricia हा ऑनलाइन उपक्रम सुरू केला आहे; मात्र त्यांच्या पायाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर ‘त्यांच्यावर कोविड लशीचा विपरीत परिणाम झाला,’ असा उल्लेख त्या पेजवरही करण्यात आला होता; मात्र नंतर त्यात बदल करून त्यांच्या त्वचारोगाचं कारण अज्ञात असल्याचा उल्लेख त्यात करण्यात आला. तसंच, त्यांना प्लासिबो लस देण्यात आली असल्याचाही उल्लेख त्यात करण्यात आला आहे.

असं असलं तरीही त्या पेजवरची आधीची पोस्ट लसीकरणाविरोधात प्रचार-प्रसार करणाऱ्या कार्यकर्त्यांनी कॉपी केली आणि ती पसरल्यामुळे चँडलर यांना त्रास सोसावा लागला. लसीचे विरोधक आणि लसीला पाठिंबा देणारे अशा दोन्ही गटांकडून चँडलर यांच्यावर टीका झाली. चँडलर यांनी अधिकृत माहिती नसताना असे फोटो शेअर का केले, असा सवाल लशीच्या समर्थकांनी केला आहे.

शेवटी, चँडलर यांना खरी लस दिली गेलीच नव्हती, ही गोष्ट संशोधकांना जाहीर करण्यावाचून पर्याय उरला नाही. सोशल मीडियावर एखादी गोष्ट व्हायरल झाली की किती मनस्ताप होऊ शकतो, याचं हे उदाहरण.

First published:

Tags: Corona vaccine