• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • Facial Exercises: ही 5 अक्षरं दररोज उच्चारलात तर स्किनला होतील चांगले फायदे, सुरकुत्या होतील कमी

Facial Exercises: ही 5 अक्षरं दररोज उच्चारलात तर स्किनला होतील चांगले फायदे, सुरकुत्या होतील कमी

वाढत्या वयामुळे चेहऱ्यावर दिसणारे बदल हा अनेक महिलांसाठी चिंतेचा विषय असतो. चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी करण्यासाठी महिला अनेक उपाय करतात; मात्र या समस्येवर फेशियल योगा (Facial Yoga) हा सर्वोत्तम उपाय ठरू शकतो.

 • Share this:
  सुंदर, तरुण आणि आकर्षक दिसण्यासाठी महिला नेहमीच विशेष काळजी घेतात. अनेक महिला याकरिता बाजारातल्या विविध सौंदर्यप्रसाधनांचाही (Cosmetics) वापर करतात. काही महिला आकर्षक व्यक्तिमत्त्वासाठी वैद्यकीय उपचारही घेतात. वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर सुरकुत्या (Wrinkles) आणि बारीक रेषा दिसू लागतात. हे रोखण्यासाठी महिला विविध स्किनकेअर उत्पादनांचा (Skin care Products) वापर करतात; मात्र कायम तरुण, आकर्षक दिसण्यासाठी असे काही उपाय आहेत, की जे महिला दिवसभरात अगदी सहजपणे करू शकतात. याविषयीची माहिती `झी न्यूज हिंदी`ने प्रसिद्ध केली आहे. वाढत्या वयामुळे चेहऱ्यावर दिसणारे बदल हा अनेक महिलांसाठी चिंतेचा विषय असतो. चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी करण्यासाठी महिला अनेक उपाय करतात; मात्र या समस्येवर फेशियल योगा (Facial Yoga) हा सर्वोत्तम उपाय ठरू शकतो. फेशियल योगामध्ये काही अक्षरांच्या (Alphabets) उच्चारांचा समावेश होतो. यामुळे तुमच्या त्वचेला विशेष फायदा होतो. या अक्षरांच्या उच्चारामुळे चेहऱ्यावरच्या स्नायूंना ताण बसतो. त्यामुळे तेथील रक्तप्रवाह (Blood Circulation) वाढतो. त्वचेला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा होतो. यामुळे सुरकुत्या दूर होण्यास मदत होते. त्वचेसाठी आवश्यक असणाऱ्या कोलॅजन निर्मितीसाठी हा उपाय विशेष फायदेशीर ठरतो. फेशियल योगा करताना आ, ऊ या अक्षरांचा दररोज 15 ते 20 वेळा उच्चार करावा. ई आणि ऊ ही अक्षरं एका वेळी म्हटल्यानं त्वचेला विशेष फायदा होतो. O, E आणि x ही इंग्रजी अक्षरं या योगात समाविष्ट केल्यास चांगला फरक दिसून येतो. ही अक्षरं दररोज 5 मिनिटं उच्चारणं गरजेचं आहे. या अक्षरांचा सातत्यानं उच्चार केल्यानं जबड्याचे बंध, मान, गालाचे स्नायू ताणले जातात आणि त्याचा फायदा त्वचेला होतो. हे ही वाचा-नुसती मेंदी नको; घनदाट काळ्या केसांसाठी त्यात या बाबींचा समावेश ठरले फायदेशीर तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या अक्षरांच्या उच्चारांमुळे महिलांच्या त्वचेच्या समस्या दूर होऊ शकतात. चेहऱ्यावर झळाळी येते. फेशियल योगा करतेवेळी स्नायूंना विशेष ताण बसतो. यामुळे तणाव दूर होतो. तसंच चेहऱ्यावरचा अतिरिक्त मेद कमी होण्यास मदत होते. हा फेशियल योगा करण्यासाठी महिलांनी दररोज 10 ते 15 मिनिटं वेळ देणं आवश्यक आहे. चेहऱ्यावरचे स्नायू रेखीव व्हावेत यासाठी फेशियल योगा हा व्यायामाचा प्रकार अतिशय लाभदायक असल्याचं तज्ज्ञ सांगतात. फेशियल योगा दररोज केल्यानं वाढत्या वयामुळे चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या दूर होण्यास मदत होते. आकर्षक, सुंदर आणि तरुण दिसण्यासाठी महिलांनी हा योग रोज करावा, असा सल्लादेखील तज्ज्ञांनी दिला आहे.

  First published: