भंडारा, 23 ऑगस्ट : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना विभागात 50 रुपयात खर्रा आणि 300 रुपयांमध्ये दारू मिळत असल्याच्या आरोप भंडारा सामान्य रुग्णाल्याचे जिल्हा शल्य चिकिस्तक प्रमोद खंडाते यांनी फेटाळून लावले आहे. स्वतः जिल्हाधिकारी मार्फत चौकशी करणार असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
सामान्य रुग्णालयातील कोरोना वॉर्डमध्ये उपचार घेणाऱ्या व्यक्तीला खर्रा किंवा दारू हवी असेल तर त्यांना काही कर्मचारी केवळ 50 रुपयात खर्रा आणि 300 रुपयांमध्ये दारू आणून देतात,असा गंभीर आरोप एका रुग्णाने केला आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणत वाढत असून दरम्यान मृतकाच्या आकडा ही वाढत चालला असल्याने सर्वत्र जिल्हा प्रशसनावर टीका होत असताना परत कोरोना वार्डमध्ये दारू आणि खर्रा मिळत असेल तर हा कसा उपचार? असा प्रश्न उपस्थितीत झाला आहे.
मात्र, याबाबत जिल्हा शल्य चिकिस्तक यांनी हे संपूर्ण आरोप फेटाळून लावले असून तिथे सुरक्षारक्षक असल्याने असे प्रकार होणे अशक्य आहे, असं जिल्हा शल्य चिकिस्तक प्रमोद खंडाते यांनी सांगितले.
तर याबाबत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना विचारणा केली असता कोरोना वार्डामध्ये पेशंटची आत्महत्या खपवून न घेता भंडारा जिल्हाधिकारी एम जे प्रदीपचंद्रन यांची उचलबांगडी करण्यात आली असून हे ही प्रकरण खपवून घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
तर आता या प्रकरणात भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना गरम पाणी, जेवण बरोबर मिळत नसल्याच्या अनेक आरोप होत असताना आता दारू व खर्रा मिळणाऱ्या बातमीने पुन्हा सामान्य रुग्णालय चर्चेत आले असून याची चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.