VIDEO : FACEBOOK LIVE च्या नादात सात जणांचा मृत्यू? अपघातापूर्वीचा व्हिडीओ व्हायरल

तरूण वेगानं कार चालवत फेसबुक लाईव्ह करत असल्याचं स्पष्ट झालंय. फेसबुक लाईव्हमुळं लक्ष विचलित झाल्याने चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला आणि अपघात झाला असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 16, 2018 11:24 AM IST

VIDEO : FACEBOOK LIVE च्या नादात सात जणांचा मृत्यू? अपघातापूर्वीचा व्हिडीओ व्हायरल

पुणे,ता.15 जुलै : आज दुपारी जुन्या मुंबई - पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात 7 तरूणांचा मृत्यू झाला होता. त्या तरूणांचं फुटेज समोर आलं असून ते तरूण वेगानं कार चालवत फेसबुक लाईव्ह करत असल्याचं स्पष्ट झालंय. पावसाची संततधार, बेफाम वेगात असलेली कार आणि बेफिकीरपणे करीत असलेलं फेसबुक लाईव्ह यामुळं चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला आणि अपघात झाला असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या अपघाताची चौकशी पोलीस करत आहेत. अपघातातल्या मृतांची नाव समोर आली आहेत. हा भीषण अपघात रविवारी दुपारी जुन्या पुणे मुंबई महामार्गावर कार्ला फाट्याजवळ झाला. पुण्यावरून येणारी कार भरधाव वेगात होती. चालकाचे गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि ही कार डिव्हायडर तोडून बाजूच्या लेनवर धडकली आणि सॅण्ट्रो कारवर धडकल्याची माहिती पोलीस आणि प्रत्यक्षदर्शींनी दिली. या अपघातात सात जण जागीच ठार झाले. हा अपघाच एवढा भीषण होता की दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला. स्विफ्ट कार पुण्याहून मुंबईकडे (एम एच 14 / सी एक्स 8339) येत होती तर सॅण्ट्रो (एम एच 12 / ई एक्स 1682) मुंबईहून पुण्याकडे जात होती.

सॅण्ट्रो कार मधले प्रवासी - राजीव जगन्नाथ बहिरट, सोनाली बहिरट, जान्हवी बहिरट, जगन्नाथ बहिरट हे पुण्यातील बी.टी. कवडे रोड मुंढवा येथील रहिवासी होते तर

स्विफ्ट कार मधले प्रवासी - संजिव कशवाह, कृष्णा शिरसाठ, निखिल सरोदे हे सर्व पिंपरी चिंचवड मधील अमरदिप कॉलनी रहाटणी परिसरातील रहिवासी होते

या अपघातात जखमी झालेले प्रतिक सरोदे, आकाश मदने, रोहित कड, किशोर मूल हे पिंपरीतील रहिवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्या वर सध्या उपचार सुरू आहेत.

नेमकं काय झालं?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 15, 2018 10:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close