Elec-widget

सावधान! Facebook वर या 5 गोष्टी शेअर करायची सवय असेल तर काळजी घ्या

फेसबुकवर केल्या जाणाऱ्या पोस्टमध्ये आजकाल लहान-सहान गोष्टी शेअर केल्या जातात.

  • Share this:

सोशल नेटवर्किंग साइट फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या 2 अब्ज इतकी आहे. बुधवारी रात्री अचानक तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने फेसबुक युजर्सना खाते हॅक झाल्याची भीती वाटत होती. फेसबुकवर केल्या जाणाऱ्या पोस्टमध्ये आजकाल लहान-सहान गोष्टी शेअर केल्या जातात.  यात आपण काय केलं इथंपासून ते काय करणार इथंपर्यंत शेअर केलं जातं. पण अशा पोस्टमुळे तुमची सुरक्षा धोक्यात येऊ शकते हे माहिती आहे का?

फेसबुकवर जर तुम्ही जन्म तारीख शेअर करत असाल तर सावध रहा. अनेकजण पासवर्डमध्ये जन्मतारखेचा वापर करतात. त्यामुळे हॅकर्सना तुमची माहिती चोरण्यासाठी जास्त वेळ लागत नाही.

मोबाईल नंबर फेसबुकवर देऊ नये. यामुळे युजरच्या सुरक्षिततेला धोका पोहचू शकतो. फेसबुक ओपन करण्यासाठी तुम्ही नंबर दिला असेल तर ‘Only Me’ सेटिंग वापरून नंबर कोणाला माहिती होणार नाही.

Loading...

अनेकांना आपण कुठे आहोत? काय करतोय? इत्यादी माहिती पोस्ट करण्याची सवय असते. जर तुम्ही घरातील फोटो आणि लोकेशन पोस्ट केले असेल तर हे धोकादायक असते. फेसबुकवरून लोकेशन पाहून कोणीही अनोळखी तुमच्या घरापर्यंत पोहचू शकतो.

लहान मुलांचे फोटो पोस्ट करण्याची जणू स्पर्धाच लागलेली आहे. असे फोटो टाकल्याने त्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता असते. कोणीही या फोटोंचा वापर करुन फेक अकाउंट ओपन करु शकतात.

तुम्हाला फिरायला जाण्याची आवड असेल तर जरुर जा. फिरुव आल्यावर त्याचे फोटोही टाका. मात्र, फिरायला जाण्यापूर्वी त्याची माहिती फेसबुकवर देऊ नका. या माहितीचा वापर करुन घरात चोरी केली जाऊ शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 14, 2019 04:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...