झुकरबर्गनं केलं प्राॅमिस, WhatsApp प्रमाणे सुरक्षित होणार फेसबुक

युजर्सच्या डेटा सिक्युरिटीवर उभ्या राहिलेल्या प्रश्नचिन्हांवर आज सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी एक ब्लाॅग पोस्ट लिहिलीय.

News18 Lokmat | Updated On: Mar 7, 2019 02:06 PM IST

झुकरबर्गनं केलं प्राॅमिस, WhatsApp प्रमाणे सुरक्षित होणार फेसबुक

मुंबई, 07 मार्च : युजर्सच्या डेटा सिक्युरिटीवर उभ्या राहिलेल्या प्रश्नचिन्हांवर आज सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी एक ब्लाॅग पोस्ट लिहिलीय. त्यात म्हटलंय, युजर्सचा डेटा सुरक्षित राहण्यासाठी ते योजना आखतायत. झुकरबर्गनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय, एनक्रिप्शन फेसबुकच्या भविष्याच्या महत्त्वाच्या योजनेपैकी एक आहे. या पोस्टवरून हे जाणवतं की फेसबुक लवकरच आपलं सर्व लक्ष पब्लिक पोस्टच्या जागी आपल्या मेसेजिंग अॅपवर एनक्रिप्शन आणि इफर्मल कम्युनिकेशनकडे करणार आहे.

आपल्या 3,200 शब्दांच्या ब्लाॅगपोस्टमध्ये झुकरबर्गनं लिहिलंय, जे देश एनक्रिप्शनची परवानगी देत नाहीत, त्या देशांत फेसबुकला बॅन व्हायला आवडेल. त्यानं लिहिलंय की भविष्यात प्रायव्हसी फोकस्ड कम्युनिकेशन प्लॅटफाॅर्म आजच्या ओपन प्लॅटफाॅर्मच्या तुलनेत जास्त महत्त्वाचा ठरेल. आपण पाहतो की खाजगी मेसेज, इफर्मल स्टोरीज आणि छोटे ग्रुप्स आज वाढत्या आॅनलाइन कम्युनिकेशन क्षेत्रातले आहेत. झुकरबर्गनं पुढे लिहिलंय, पब्लिक सोशल नेटवर्क आपल्या जागी आहे. पण जे प्रायव्हसीला फोकस करतात त्यांच्याकडे मोठी संधी आहे


झुकरबर्गनं पुढे लिहिलंय की कम्युनिकेशन सतत प्रायव्हेट आणि एनक्रिप्टेड सर्विसेजकडे शिफ्ट होतंय, ज्यावर लोक भरवसा ठेवू शकतात. हेच पुढचं भविष्य आहे आणि तेच मी आणण्यासाठी मदतीची अपेक्षा करतोय.

त्यानं आपल्या ब्लाॅगमध्ये लिहिलंय, आम्ही फेसबुकच्या मेसेजिंग प्लॅटफाॅर्मला व्हाॅट्सअॅपप्रमाणे तयार करतोय. ते पूर्ण सुरक्षित इंटरअॅक्टिव्ह करण्याची योजना आहे. ज्यात काॅल, व्हिडिओ चॅट, ग्रुप, स्टोरीज, बिझनेस, पेमेंट अशा सर्व सेवा मिळतील.

Loading...

यामुळे आता फेसबुक मेसेंजर एकदम सुरक्षित, एनक्रिप्टेड होईल आणि खुद्द फेसबुकही त्यावरचा चॅट वाचू शकणार नाही.


#FitnessFunda : 'या' आहारामुळे साराचं वजन आता वाढत नाहीबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 7, 2019 02:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...