मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

औरंगाबाद विद्यापीठात पीएचडीसाठी धक्कादायक प्रकार उघड, विद्यार्थ्यांना लुटणारी ऑडिओ क्लिप व्हायरल

औरंगाबाद विद्यापीठात पीएचडीसाठी धक्कादायक प्रकार उघड, विद्यार्थ्यांना लुटणारी ऑडिओ क्लिप व्हायरल

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आता पुन्हा एकदा पीएचडी (PHD) विभागात  कसा भ्रष्टाचार चालत आहे, याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आता पुन्हा एकदा पीएचडी (PHD) विभागात कसा भ्रष्टाचार चालत आहे, याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आता पुन्हा एकदा पीएचडी (PHD) विभागात कसा भ्रष्टाचार चालत आहे, याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे.

औरंगाबाद, 17 ऑगस्ट : औरंगाबादेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आता पुन्हा एकदा पीएचडी (PHD) विभागात  कसा भ्रष्टाचार चालत आहे, याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. विद्यार्थ्यांना pHD करताना डीन आणि मार्गदर्शक पैशांसाठी ब्लॅकमेल करत असल्याचे उघड झाले आहे. पी एच.डी.ची मौखिक परीक्षा हवी असेल तर 60 हजार रुपये मोजा असं स्वतः डीन सांगत असल्याची अशी ऑडिओ क्लिप समोर आली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कार्यरत असलेल्या सामाजिकशास्त्राच्या अधिष्ठाता डॉ प्रशांत अमृतकर यांनीच स्वत:च्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी.चे काम पूर्ण झालेल्या संशोधक विद्यार्थ्याला अंतिम मौखिक परीक्षेसाठी (व्हायवा) येणाऱ्या बहिस्थ परीक्षकास (एक्सटर्नल रेफ्री) 40 हजार रुपये देण्याचा सल्ला दिला. राहणे, जेवणासाठी अतिरिक्त 20 हजार रुपये लागतील. त्याशिवाय परीक्षाच आयोजित केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले.

जमिनीसाठी शेतकऱ्याला धमकावले, भाजपच्या जिल्ह्याध्यक्षावर खंडणीचा गुन्हा दाखल

हा संशोधक विद्यार्थी आठ हजार रुपयांवर विनाअनुदानित महाविद्यालयात अध्यापनाचे काम करीत असल्यामुळे पैसे देऊ शकत नाही. त्यामुळे मागील 2 वर्षांपासून या विद्यार्थ्याचा व्हायवाच आयोजित केला नसल्याची धक्कादायक माहिती न्यूज18 लोकमतच्या हाती लागली आहे. पैसे मागितले आणि ते देण्यास असमर्थ असल्याच्या 3 ऑडिओ क्लिप समोर आल्या आहे. तेव्हा या अधिष्ठातांनी काहीही बोलण्यास नकार दिला आहे.

60 हजारांसाठी विद्यार्थी आणि अधिष्ठातामधील संवाद

विद्यार्थी : सर, व्हायवाची तारीख मिळाली का?

अधिष्ठाता : नाही.

विद्यार्थी : तुम्हाला भेटायला यावं म्हणतोय. पुढची डेट घेण्यासाठी.

अधिष्ठाता : या ना मग.

विद्यार्थी : कधी येऊ

अधिष्ठाता : कधीही या. तुम्ही याल तेव्हा बोलेल त्यांच्याशी

विद्यार्थी : उद्या येऊ का?

अधिष्ठाता : उद्या 12 तारीख. असं करा सोमवारी या.

विद्यार्थी : सोमवारी येणे कठीण आहे सर.

अधिष्ठाता : उद्या येता मग त्यांना विचारावे लागेत डेटविषयी पण डेटपेक्षा त्यांची व्यवस्था करावी लागेल तुम्हाला

विद्यार्थी : सर व्यवस्था करू ना.

अधिष्ठाता : व्यवस्था पहिले करून घ्या ना

विद्यार्थी : करतो ना सर

अधिष्ठाता : पहिले व्यवस्था करा. ते घेऊन या मग मी बोलतो त्यांच्याशी.

विद्यार्थी : सर, केवळ त्याच्यामुळंच लांबतंय का?

अधिष्ठाता : मला तर तसंच वाटतंय.

विद्यार्थी : तेवढे 40 हजार फार होतायत ना सर... हॅलो... हॅलो... सर माझी तडजोड सुरू आहे. पैसे इकडून तिकडून बघत आहे. अजून या महिन्याचा पगार झाला नाही. दुसऱ्यांकडून घेणं, विचारणं सुरू आहे. डेट वगैरे मिळाली. फायनल झाली असती तर काही करता आलं असतं.

अधिष्ठाता : मला यावर जास्त बोलता येत नाही. माझं काम संपलेलं आहे. यापलीकडं माझं काम नाही. काय ते तुम्ही पाहा.

दुसरी क्लिप

सदाभाऊ खोतांच्या चालकाची भर चौकात गुंडाने अडवली गाडी, चाकूने केला हल्ला

अधिष्ठाता : तुम्ही माझ्याकडे या. तुमचंच काम आहे. माझं नाही.

विद्यार्थी : माझंच काम आहे. बरोबर आहे आणि सर त्यात काही कमी होणार नाही का?

अधिष्ठाता : तुमच्याकडे किती आहेत सध्या

विद्यार्थी : दहा-पंधरा हजार रुपयांपर्यंत आहेत.

अधिष्ठाता : तुम्ही एक काम करता. सध्या तुम्ही वीस हजार आणून द्या. बाकीचे मी टाकतो. नंतर तुमच्या पद्धतीने मला द्या.

विद्यार्थी : सर आता 15 हजार रुपये आहेत.

अधिष्ठाता : 15 नाही. 20 हजार रुपये द्या. उर्वरित मी टाकत आहे. यापेक्षा अधिक मदत मी काय करू शकतो. तुम्ही तरी सांगा. आधीच खूप व्हायवा लांबलेला आहे. माझ्या डोक्याला ताप आहे. तो तरी कमी होईल.

तिसरी क्लिप

अधिष्ठाता : मला माहीत आहे. सगळ्यांना द्यावेच लागतात. तो माणूस येतो  एक दिवस घालवतो. थेसिस वाचून रिपोर्ट पाठवतो. त्यामुळे त्याला पैसे देणे अपेक्षितच आहे. आता सगळीकडेच हे सुरू आहे. आम्हीही बाहेर जात असतो. सगळ्यांनाच अपेक्षित असते.

विद्यार्थी : सर पाच-सात हजार होते का ते बघा ना.

अधिष्ठाता : नाही होत हो आता.

विद्यार्थी : तुम्हाला रिक्वेस्ट करतो आता. तुम्हाला गिफ्ट देतो.

अधिष्ठाता : मला रिक्वेस्ट करून काय फायदा हो.  मला गिफ्ट नको हो. मीसुद्धा बाहेर गेल्यावर घेतो ना. मी काही फुकट जात नाही ना.

First published:

Tags: Aurangabad