राज्यात घातपाताचा कट? या ठिकाणी सापडली स्फोटकं

राज्यात घातपाताचा कट? या ठिकाणी सापडली स्फोटकं

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पालघरमध्ये आता स्फोटकं सापडली असून मुंबईमध्ये देखील हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

  • Share this:

पालघर, 4 मार्च : पुलवामा हल्ल्यानंतर देशातील प्रमुख ठिकाणांच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात आली आहे. शिवाय, अनेक ठिकाणी हाय अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. यापूर्वी कर्जत येथे एसटीमध्ये बॉम्ब सापडला होता. त्यानंतर आता पालघरमध्ये देखील आता 24 डेटोनेटर आणि अमोनियम नायट्रेट सापडलं आहे. ही स्फोटकं पोलिसांनी ताब्यात घेतली असून आता तपासाला सुरूवात केली आहे. त्यानंतर आता मुंबईमध्ये सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.

पुलावामा हल्ल्यानंतर दहशतवादी जम्मू - काश्मीरच्या बाहेर देशातील इतर शहरांना लक्ष्य करण्याच्या तयारीमध्ये असल्याचं वृत्त आहे. त्यामुळे देशातील प्रमुख शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. शिवाय, मुंबईतील रेल्वे स्थानकं आणि लोकलच्या सुरक्षेमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमिवर आता पालघरमध्ये सापडलेल्या स्फोटकांचं गांभीर्य वाढलं आहे.

विमान अपहरणाचा कॉल

काही दिवसांपूर्वी एअर इंडियाला विमान अपहरणाचा कॉल आला होता. त्यानंतर विमानतळांच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. तर, बांगलादेशमध्ये एकानं केलेला विमान अपहरणाचा प्रयत्न फसला. या व्यक्तिनं विमान अपहरण करत बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना भेटण्याची मागणी केली होती.

'पंतप्रधानजी, तुम्हाला जराही लाज वाटत नाही?'

कर्जतमध्ये एसटीमध्ये IED

21 फेब्रुवारी रोजी रायगड जिल्ह्यातील कर्जत-आपटा एसटीमध्ये IED बॉम्ब सापडला होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर बॉम्ब स्क्वॉड पथकाने घटनास्थळी दाखल होत हा बॉम्ब निकामी केला. त्यामुळे कोणतीही हानी झालेली नाही. दरम्यान, याबाबत सध्या तपास सुरू आहे.

40 जवान शहीद

पुलवामातील दहशतवाद्यांच्या आत्मघातकी हल्ल्यामध्ये 40 जवान शहीद झाले. यावेळी भारतानं दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करणार असल्याचं सांगत एअर स्ट्राईक केला. त्यामध्ये 200 ते 300 दहशतवादी ठार झाले. दरम्यान, आता दहशतवाद्यांच्या उद्धवस्त तळांचे सॅटेलाईट फोटो देखील समोर आले आहेत.

'बगिरा'चा LATEST VIDEO पाहिला का? 'इथे' फिरताना दिसला तो

First published: March 4, 2019, 12:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading