BREAKING : अज्ञात वस्तूच्या स्फोटामुळे कोल्हापुरात खळबळ, एकाचा मृत्यू

BREAKING : अज्ञात वस्तूच्या स्फोटामुळे कोल्हापुरात खळबळ, एकाचा मृत्यू

बेवारस वस्तूला लाथ मारल्यानंतर स्फोट झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे.

  • Share this:

संदीप राजगोळकर, प्रतिनिधी

कोल्हापूर, 19 ऑक्टोबर : राज्यात सध्या निवडणुकांची रणधुमाळी असतना कोल्हापूरमध्ये भीषण स्फोट झाला असल्याची माहिती समोर आली आहे. कोल्हापुरातील उजळाईवाडी ब्रिजखाली हा स्फोट झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. या स्फोटामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. घटनेबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, बेवारस वस्तूला लाथ मारल्यानंतर स्फोट झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. या स्फोटाची तीव्रता इतकी जास्त होती की, यामध्ये शेजारी उभ्या असलेल्या गाड्यांच्या काचांनाही तडे गेले आहेत तर एकाने यामध्ये प्राण गमावला आहे. दत्तात्रय पाटील असं मृत व्यक्तीचं नाव आहे. ते लघुशंकेसाठी गेले असता त्यांनी एका अज्ञात वस्तूला लाथ मारली आणि त्याचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात दत्तात्रय पाटील यांच्या शरीराचा चेंदामेंदा झाला आहे.

उजळाईवाडी उड्डाणपूल इथे मध्यरात्री ही घटना घडली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दत्तात्रय यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर पोलीस आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे.

इतर बातम्या - मतदानासाठी या 11 पैकी कुठलंही ओळखपत्र चालणार निवडणूक आयोगाने दिली यादी

इतका भीषण स्फोटा घडवणारी अशी कोणती वस्तू होती? आणि ती अशा अज्ञात स्थळी कोणी आणि का ठेवली? याचाही पोलीस तपास करत आहे. परिसरात अशा प्रकारे स्फोट झाल्यामुळे काही घातपात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिसांकडून सुरक्षेतही वाढ करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अशात काही हल्ला करवण्याचा कोणी प्रयत्न करत आहे का याची माहिती पोलीस मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. तर अशा कोणत्याही वस्तूला हात लावू नये अशा सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत.

इतर बातम्या - आज प्रचाराचा शेवटचा दिवस गाजणार, मुख्यमंत्री ते राज ठाकरे अशा आहेत सभा!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 19, 2019 08:43 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading