नवी दिल्ली, 19 मे : लोकसभा निवडणुकीसाठी सर्व सात टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर आता एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. वेगवेगळ्या संस्थांनी केलेल्या या पोल्समध्ये अनेकांनी मोदी सरकारला बहुमत दिलं आहे. पण एबीपी-नेल्सचा एक्झिट पोल मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चिंता वाढवणारा आहे. कारण या पोलमध्ये एनडीएला बहुमत मिळणार नाही, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
काय आहे एबीपी-नेल्सचा पोल?
या पोलनुसार उत्तर प्रदेशात भाजपला मोठा धक्का बसत आहे. युपीत महाआघाडी जोरदार कमबॅक करताना दिसत आहे. इथं भाजपप्रणित एनडीएला अवघ्या 22 जागा मिळताना दिसत आहेत. तर दुसरीकडे सपा-बसपाच्या महाआघाडीला मात्र इथं 56 जागांवर विजय मिळत आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशात काँग्रेस अपयशी झाल्याचं चित्र आहे. काँग्रेसला केवळ 2 जागा मिळतील, असा अंदाज वक्त करण्यात आला आहे.
देशभरात किती जागा?
एनडीए - 267
युपीए - 127
सपा-बसपा - 56
इतर - 84
'न्यूज18'चा EXIT POLL : कुणाला धक्का, कुणाचा विजय? वाचा महाराष्ट्राची संपूर्ण आकडेवारी
लोकसभा निवडणुकीसाठी सर्व सात टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर आता एक्झिट पोल समोर आले आहेत. 'न्यूज18' ने केलेल्या एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीला पुन्हा एकदा मोठा धक्का बसताना दिसत आहे. तर भाजप शिवसेना दमदार कामगिरी करेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात कुणाला किती जागा?
भाजप - 21 ते 23
शिवसेना - 20 ते 22
काँग्रेस - 0 ते 1
राष्ट्रवादी - 3 ते 5
लोकसभा निवडणूक 2014 जागा 543
पक्ष जागा टक्केवारी
भाजप 282 31.04 टक्के
काँग्रेस 44 19.27 टक्के
एडीएमके 37 3.27 टक्के
टीएमसी 34 3.85 टक्के
बीजेडी 20 1.72 टक्के
शिवसेना 18 1.86 टक्के
टीडीपी 16 2.49 टक्के
अन्य 92 36.26 टक्के
EXIT POLL VIDEO : सुळे की कुल, खैरे की जलील; कोण जिंकणार?