• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • EXIT POLL : काँग्रेसच्या राज्यात राहुलला धक्का, मोदी लाटमुळे पुन्हा 'कमळ'

EXIT POLL : काँग्रेसच्या राज्यात राहुलला धक्का, मोदी लाटमुळे पुन्हा 'कमळ'

2014मध्ये एक्झिट पोलद्वारे वेगवेगळे दावे करण्यात आले होते. मध्य प्रदेशमध्ये 29 लोकसभा जागा आहे. मागच्या लोकसभा निवडणुकांमधला एक्झिट पोलचा अंदाज खरा होताना पाहायला मिळाला.

 • Share this:
  मध्य प्रदेश, 19 मे : लोकसभा निवडणूक 2019मध्ये सर्व सातही टप्प्यांतील मतदान पार पडलं असून आता प्रतिक्षा आहे ती 23 तारखेला लागणाऱ्या निकालाची. यावेळी भाजप बाजी मारणार की विरोधक मुसंडी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. पण त्याआधी एक्झिट पोलद्वारे कोण विजयी होणार याचं भाकित करण्यात आलं आहे. 2014मध्ये एक्झिट पोलद्वारे वेगवेगळे दावे करण्यात आले होते. मध्य प्रदेशमध्ये 29 लोकसभा जागा आहे. मागच्या लोकसभा निवडणुकांमधला एक्झिट पोलचा अंदाज खरा होताना पाहायला मिळाला. सीएनएन न्यूज 18 ने दिलेल्या अंदाजानुसार, भाजप 26 तर काँग्रेस 3 जागांवर जिंकू शकतो असे निकाल देण्यात आले होते. टाईम्स नाऊने दिलेल्या अंदाजानुसार, भाजप 18 जागांवर विजय मिळवणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. तर यंदाच्या एक्झिट पोलच्या आकड्यानुसार आताही भाजपला सर्वाधिक जागा देण्यात आल्या आहे. यंदाच्या टाईम्स नाउने दिलेल्या एक्झिट पोलनुसार एनडीएला 306, यूपीएला 132 आणि इतरांना 104 जागा मिळतील असा अंदाज देण्यात आला आहे. 2014मध्ये मध्य प्रदेशात भाजपला 29 पैकी 26 जागा मिळतील असा अंदाज देण्यात आला होता तर काँग्रेसला 3 जागांवरच समाधान मानावं लागेल असा दावा करण्यात आला होता. याचबरोबर इंडिया ट्वीहीनुसार, भाजपला 26 तर काँग्रेसला 3 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. 2014च्या अंदाजानुसार सगळ्याच माध्यमांनी भाजप बाजी मारणार असा अंदाज वर्तवला होता. टू डेज् चाणक्यने दिलेल्या एक्झिट पोलनुसार भाजपला सर्वाधिक म्हणजेच 27 जागा मिळतली तर काँग्रेसला 2 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, 2014च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेशमध्ये भाजपने 27 तर काँग्रेसने 2 जागांवर विजय झाला होता. त्यामुळे यंदा मध्य प्रदेशमध्ये पुन्हा बाजी मारणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. खरंतर, 2018मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसनं बाजी मारत मध्य प्रदेशमध्ये सत्ता स्थापन केली होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकांमध्येही राहुल गांधीच काँग्रेसचा झेंडा फडकवणार अशी चिन्ह दिसत होती. पण समोर आलेल्या एक्झिट पोलनुसार, भाजपला सर्वाधिक जागा देण्यात आल्या आहेत. विदर्भात 'कमळ' उमलणार का? पाहा पहिल्या टप्प्याचा EXIT POLL VIDEO
  First published: