News18 Lokmat

Exit Poll 2019 : हे आहेत एक्झिट पोलमधील महत्त्वाचे मुद्दे!

न्यूज18च्या एक्झिट पोलनुसार देशात एनडीएची सत्ता येणार असल्याचा अंदाज आहे.

News18 Lokmat | Updated On: May 19, 2019 09:36 PM IST

Exit Poll 2019 : हे आहेत एक्झिट पोलमधील महत्त्वाचे मुद्दे!

मुंबई, 19 मे : लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदानानंतर आता न्यूज18च्या एक्झिट पोलनुसार NDAला सत्ता मिळताना दिसत आहे. यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे राज्यात देखील शिवसेना – भाजपचा वरचष्मा दिसून येत आहे. तर, आघाडीला धक्का बसताना दिसत आहे. मुंबईतील 6 जागा या युतीला मिळताना दिसत आहेत. दुसरीकडे मावळ आणि शिरूरमध्ये पार्थ पवार आणि अमोल कोल्हे यांच्या विजयाची देखील खात्री दिसत नाही. तर, नाशिकमधून समीर भुजबळ देखील डेंजर झोनमध्ये आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे शिवसेनेच्या 3 ते 4 जागा वाढत असून मनसेनं घेतलेल्या सभांचा प्रभाव देखील दिसून येत नाही.

उत्तर प्रदेशात भाजप लाट

सर्वाचं लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेशमध्ये देखील भाजप लाट कायम असल्याचं न्यूज18च्या एक्झिट पोलमधून दिसून येत आहे. तर, महागठबंधन आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर दिसत आहे. आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशमध्ये प्रियांका गांधी यांची जादू चालताना दिसत नाही.

न्यूज18च्या एक्झिट पोलनुसार बिहारमध्ये मोदी आणि नितीशकुमार लाट दिसत आहे. तर, काँग्रेस – आरजेडीला फटका बसताना दिसत आहे. तर, राजस्थानमध्ये देखील भाजपचीच हवा दिसून येत आहे.

सहाव्या टप्प्यामध्ये एनडीएला फायदा

Loading...

सहाव्या टप्प्यातील मतदानानंतर NDAची हवा कायम दिसून येत आहे. एनडीएची 292 – 312 आकडेवारी पाहता एनडीए सहाव्या टप्प्यामध्ये बहुमताची आकडेवारी पार करताना दिसत आहे. एकंदरीत सारी आकडेवारी पाहता तिसऱ्या आघाडीला लोकांनी नाकारल्याचं दिसून येत आहे.

सहाव्या टप्प्याअखेर युपीए 67पैकी भाजप 54 जागा राखणार असल्याचं आकडेवारीवरून दिसून येत आहे. तर, सपा – बसपला 12 ते 16 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

पश्चिम बंगालमध्ये ममतांची जादू कायम

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींची जादू कायम असल्याचं आकडेवारीवरून दिसून येत आहे. तर, मध्यप्रदेशमध्ये देखील भाजपचीच जादू दिसून येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 19, 2019 09:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...