EXIT POLL 2019 : मुंबईत भाजपसाठी धक्कादायक निकाल, 'या' जागी जिंकणार काँग्रेस!

2014 च्या निवडणुकीत पूनम महाजन यांनीच प्रिया दत्त यांना पराभूत केलं होतं.

News18 Lokmat | Updated On: May 20, 2019 06:56 PM IST

EXIT POLL 2019 : मुंबईत भाजपसाठी धक्कादायक निकाल, 'या' जागी जिंकणार काँग्रेस!

मुंबई, 20 मे : लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी एक्झिट पोल जाहीर करण्यात आले आहे. उत्तर मध्य मुंबईतून प्रिया दत्त या विजयी होणार असा अंदाज एबीपी आणि नेल्सन या संस्थेनं केलेल्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. या मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार पूनम महाजन यांना पराभवाला सामोरं जावं लागणार आहे.

2014 च्या निवडणुकीत पूनम महाजन यांनीच प्रिया दत्त यांना पराभूत केलं होतं. परंतु, पाच वर्षातच मतदारांनी पूनम महाजन यांना नाकारलं असून प्रिया दत्त यांच्या गळ्यात पुन्हा एकदा विजयाची माळा घातली आहे.


संमिश्र मतदारसंघ

उच्चभ्रू आणि गरीब असे दोन्ही मतदार असलेल्या उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात युतीच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांची लढत काँग्रेसच्या प्रिया दत्त यांच्याशी होती. पूनम महाजन या भाजयुमोच्या अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे भाजपचं संघटनात्मक पाठबळ आहे. त्यांनी आतापर्यंत केलेलं काम पुस्तिका काढून मतदारांपर्यंत पोहोचवलं होतं. तरीही नोटबंदी, जीएसटी यासारखे भाजप सरकारच्या विरोधात जाणारे मुद्दे हे त्यांच्यासमोरही आव्हान होते.

Loading...

प्रिया दत्त उशिरा रिंगणात

दुसरीकडे प्रिया दत्त यांनी इथून निवडणूक लढवण्याचा निर्णय उशिरा घेतला. काँग्रेसमधल्या अंतर्गत गटबाजीचा फटका त्यांना बसू शकतो, अशी चर्चा होती. कुर्ला, बांद्रा, विलेपार्ले अशा भागात मतदारांशी या दोन्ही उमेदवारांनी किती संपर्क साधला यावर त्यांचं भवितव्य अवलंबून आहे. मुंबईमधली ही लढत दोन महिला उमेदवारांमधली असल्याने या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

या लोकसभा मतदारसंघात वांद्रे पश्चिम, विलेपार्ले, कुर्ला, कलिना, चांदिवली,वांद्रे पूर्व हे विधानसभा मतदारसंघ येतात. मागच्या लोकसभा निवडणुकीत पूनम महाजन यांनी प्रिया दत्त यांचा पराभव केला होता.

चुरशीच्या लढती

दक्षिण मुंबई, उत्तर मुंबई यासोबतच उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, ईशान्य मुंबई या मतदारसंघात चुरशीच्या लढती पाहायला मिळत आहेत. मेट्रो रेल्वे, मोनोसारखे वाहतूक प्रकल्प आणि घरबांधणी यामुळे भाजपला मुंबईमध्ये फायदा होणार असला तरी नोटबंदी, जीएसटी, शहरी भागातली वाहतुकीची संरचना, प्रवाशांची सुरक्षितता या मुद्द्यांचं आव्हान भाजपसमोर आहे.

मनसे फॅक्टर

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद हाही मुंबईच्या निवडणुकीतला महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. राज ठाकरे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना लक्ष्य करत भाजप सरकारवर जोरदार टीका करत होते. याचा फटका भाजपला किती बसेल हे निकालातच कळेल.

=======================


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 20, 2019 06:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...