पाककडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, वाघा बॉर्डरवर यावर्षी ईदसाठी मिठाई वाटप नाही

पाककडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, वाघा बॉर्डरवर यावर्षी ईदसाठी मिठाई वाटप नाही

गेल्याकाही दिवसांपासून सीमेवर पाकिस्तानकडून सतत गोळीबार होत आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील कटुता वाढली आहे.

  • Share this:

जम्मू-काश्मीर, 16 जून : पाकिस्तानकडून सतत होत असलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनामुळे वाघा बॉर्डरवर यावर्षी ईद साजरी झाली नाही. दरवर्षी ईदच्या दिवशीवर पाकिस्तानी आणि भारतीय सैनिक परस्परांना मिठाई वाटतात, परंतु यावर्षी ही प्रथा मोडीत निघाली.

भारताकडून दरवर्षी भारतीय सैनिकांकडून पाकिस्तानला मिठाई देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या जातात. बीएसएफ चे जवान दरवर्षी पाकिस्तानच्या जवानांचं मिठाईने तोंड गोड करून ईद साजरी करत असतात. परंतु पाकिस्तानकडून सतत होत असलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनामुळे ह्यावेळी मिठाईचे वाटप झाले नाही.

गेल्याकाही दिवसांपासून सीमेवर पाकिस्तानकडून सतत गोळीबार होत आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील कटुता वाढली आहे. आज ईदच्या दिवशीही पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं गेलं ज्यात बीएसएफचा 21 वर्षीय विकास गुरूगंग हा जवान शहीद झाला. विकास हे मुळचे मणिपुरचे रहिवासी होते.

भारतीय सेनेचे एक अधिकारी म्हणाले, “ईदच्या दिवशीवर पाकिस्तानकडून होत असलेला गोळीबार चुकीचा आहे. पाकिस्तानच्या अशा वागण्यामुळे भारतीय जवानांमध्ये राग खूप आहे तरी ते सध्या संयम बाळगून आहोत."

जम्मू-काश्मीर शस्त्रसंधी उल्लंघनाशिवाय इतरही बऱ्याच घटना घडल्या. ज्यामुळे दोन्ही देशांमधील कटुता वाढली आहे. पुलवामात आतंकवादींनी सुट्टीवर जात असलेल्या जवानाचे अपहरण करून त्याची हत्या केली.

तसंच श्रीनगरचे वरीष्ठ पत्रकार आणि ‘रायजिंग कश्मीर’चे संपादक शुजात बुखारी यांची गोळी मारून हत्या केली. दुसरीकडे दिवसेंदिवस सेनेच्या जवानांवर होत असलेल्या पत्थरबाजी दोन्ही देशातील वातावरण तणावपूर्ण आहे.

या आधी मंगळवारी पाकिस्तानी सेनेद्वारा केल्या गेलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनामुळे सांबा जिल्ह्याच्या रामगढ सेक्टरमध्ये असिस्टंट कमांडंटसहित बीएसएफचे चार जवान शहीद झाले होते.

69व्या स्वातंत्र्य दिनीसुद्धा बीएसएफने पाकिस्तानी सेनेला मिठाई दिली नव्हती.

युद्धविरामवर उद्या महत्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता

जम्मू-काश्मीरमध्ये सतत होत असलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनामुळे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह उद्या महत्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. सूत्रांनुसार, भारत सरकार सद्यस्थिती बघता युद्धविरामचा निर्णय कायम ठेवेल असं वाटत नाही.

First published: June 16, 2018, 8:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading