मुंबई वगळता राज्यात गारठा, पुढचे काही दिवस असं असेल तापमान!

मुंबई वगळता राज्यात गारठा, पुढचे काही दिवस असं असेल तापमान!

गेल्या आठवड्यात अरबी समुद्रावर एकाच वेळी दोन चक्रीवादळे निर्माण झाली होती. त्यामुळे हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढले होते.

  • Share this:

मुंबई, 09 डिसेंबर : गेल्या 20 दिपसांपासून राज्यात थंडीचा पारा घसरला होता. मात्र, रविवारी राज्यात सर्वात कमी किमान तापमान नागपूर इथे 11.8 अशं सेल्सिअस एवढं नोंदवण्यात आलं. दोन दिवसांपासून जळगावसह जिल्ह्यात गारवा वाढला आहे. 20 अंशांवर गेलेला पारा आता 14 अंशांवर आल्याने वातावरणात गारवा जाणवू लागला आहे. अशात मुंबईचे किमान तापमान 22.2 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. त्यामुळे राज्यात अनेक जिल्ह्यात जरी हुडहुडी असली तरी मुंबईकर अजूनही थंडीच्या प्रतिक्षेत आहेत.

गेल्या आठवड्यात अरबी समुद्रावर एकाच वेळी दोन चक्रीवादळे निर्माण झाली होती. त्यामुळे हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढले होते. परिणामी राज्यातील काही भागांत हलक्या स्वरूपाचा पाऊसही झाला. तसेच हवेतील आर्द्रता वाढून तापमानात वाढ झाली होती. परिणामी थंडीचा कडाका कमी झाला होता. आता मात्र, हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी झाल्याने पुन्हा थंडी जाणवू लागली आहे.

राज्यातील बहुतांश ठिकाणी तापमानात घट रविवारी नोंदली गेली. महाबळेश्वर येथे 14.4, मालेगाव येथे 14, नाशिक येथे 13, मुंबई येथे 23.5, औरंगाबाद येथे 13.1, नागपूर येथे 11.8, अकोला 12.8 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदले गेले.

इतर बातम्या - महाराष्ट्रात आणखी एक बलात्काराची घटना, अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती अत्याचार

दरम्यान, अरबी समुद्राच्या दक्षिणपूर्व भागात असलेल्या ठळक कमी दाबाच्या क्षेत्राचे आता अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाले आहे. पुढील 24 तासांत त्याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत शहरासह राज्यात हवामान अंशत: ढगाळ राहील. तर पुण्यातील किमान तापमान 17 अंशांपर्यंत वाढेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.

दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोकण, गोवा, मराठवाड्याच्या काही भागांत आणि मध्य महाराष्ट्रात 9 ते 13 डिसेंबरपर्यंत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तर मुंबईसह अनेक ठिकाणी सोमवारी आणि मंगळवारी ढगाळ वातावरण असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 9, 2019 10:33 AM IST

ताज्या बातम्या