पत्नी माहेरी गेली म्हणून आला राग, माजी सैनिकाने केला धक्कादायक प्रकार

पत्नी माहेरी गेली म्हणून आला राग, माजी सैनिकाने केला धक्कादायक प्रकार

हवेत गोळीबार करणाऱ्या कुंडलीक बनसोडे यास पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

  • Share this:

सांगली, 15 ऑगस्ट : पती-पत्नी म्हटलं की वाद हा होतच असतो. पण याच वादातून गोळीबार झाल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. कौटुंबिक वादातून एका माजी सैनिकांने हवेत गोळीबार केल्याची घटना तासगांव तालुक्यात सावळज गावात घटना घडली आहे. हवेत गोळीबार करणाऱ्या कुंडलीक बनसोडे यास पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अचनाक झालेल्या गोळीबाराचा आवाज ऐकून संपर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

राज्यात ST बस आणि कोचिंग क्लासेस होणार सुरू, विजय वडेट्टीवार यांची माहिती

कुंडलीक बनसोडे पती-पत्नीमधील वादातून पत्नी आपल्या माहेरी सावळज इथे आली होती. त्यामुळे बनसोडे याने चिडून सासारवाडी गाठली, पत्नीला समजविताना दोघांत पुन्हा भांडणे सुरू झाली. रागाच्या भरात त्यांने सोबत आणलेल्या बंदूकीतून हवेत गोळीबार केला. सावळज येथील नवीन वसाहतमध्ये हा प्रकार घडला.

काँग्रेसमध्ये खळबळ, आणखी एका आमदाराला कोरोनाची लागण

हवेतील गोळीबार प्रकारानंतर गावकरी मोठ्या संख्येने जमले. घटनास्थळी एकच गोंधळ सुरू झाला. यानंतर तातडीने पोलिसांना प्राचारण करण्यात आलं. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी हवेत गोळीबार करणाऱ्या कुंडलिक बनसोडे यांना ताब्यात घेतलं.

Published by: Renuka Dhaybar
First published: August 15, 2020, 8:49 PM IST
Tags:

ताज्या बातम्या