काश्मिरी समजून शेअर केला पॉर्नस्टारचा PHOTO, पाकच्या माजी उच्चायुक्तांनी काढली लाज!

काश्मिरी समजून शेअर केला पॉर्नस्टारचा PHOTO, पाकच्या माजी उच्चायुक्तांनी काढली लाज!

भारतातील पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी काश्मीरच्या तरुणाचं ट्वीट रिट्वीट करण्याएवजी चक्क एका पॉर्नस्टारचं ट्वीट रिट्वीट केलं आहे. जॉनी सीन या पॉर्नस्टार्सचा फोटो ट्वीट अब्दुल बासित यांनी रिट्वीट केला.

  • Share this:

नवी दिल्ली, 03 ऑगस्ट : भारताने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 रद्द केल्यामुळे पाकिस्तान चक्रावलं आहे. भारताला खाली ओढण्यासाठी आणि भारताच्या अडचणी वाढवण्यासाठी सर्व स्तरातून पाकिस्तान प्रयत्न करत आहेत. पण प्रत्येक वेळी ते तोंडावर पडत आहेत. आताही त्यांनी असं काहीसं केलं आहे. भारतीय पाकिस्तानच्या माजी उच्चायुक्तांनी रिट्वीट केलेल्या एका ट्वीटमुळे पाकवर टीकांचा वर्षाव होतोय. बरं इतकंच नाही तर त्यांचं सोशल मीडियावर चांगलंच हसू झालं आहे.

भारतातील पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी काश्मीरच्या तरुणाचं ट्वीट रिट्वीट करण्याएवजी चक्क एका पॉर्नस्टारचं ट्वीट रिट्वीट केलं आहे. जॉनी सीन या पॉर्नस्टार्सचा फोटो ट्वीट अब्दुल बासित यांनी रिट्वीट केला.

ते झालं असं की, अनंतनागमध्ये दगडफेक करण्यात आली आहे. त्यामधअये पॅलेट गनमुळे युसूफ नावाच्या तरुणाचा डोळा फुटला. सगळ्यांनी याविरोधात आवाज उठवायला हवा. अशा प्रकारचा मेसेज लिहित त्याबरोबर जॉनी सीनचा फोटो टाकून एक ट्वीट करण्यात आलं होतं. तेच ट्वीट बासित यांनी रिट्वीट केलं. त्यामुळे त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात  आलं आहे.

सोशल मीडियावर या रिट्वीटने धुमाकूळ घातल्यानंतर बासित यांनी ट्वीट तात्काळ डिलीट केलं. पण तोपर्यंत नेटकऱ्यांनी त्याचा स्किनशॉर्ट काढून व्हायरल केला आहे.

First published: September 3, 2019, 2:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading