राजू शेट्टी यांची मुख्यमंत्र्यांवर नाराजी, शरद पवारांना टोला; कोल्हापुरातून केली मोठी घोषणा

माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना मिळालेल्या मदतीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाराजी व्यक्त केली.

माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना मिळालेल्या मदतीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाराजी व्यक्त केली.

  • Share this:
कोल्हापूर, 2 नोव्हेंबर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 19 वी ऊस परिषद कोल्हापूरमध्ये सुरू आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना मिळालेल्या मदतीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाराजी व्यक्त केली. तसंच येत्या 5 नोव्हेंबरला देशात किमान 2 तास रस्ता रोको करणार, अशी घोषणा शेट्टी यांनी केली आहे. 'मुख्यमंत्री नसताना जी मागणी केली ती मुख्यमंत्री असताना पूर्ण केली असती तर शेतकरी समाधानी झाला असता,' असा टोला राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. तसंच संपूर्ण महाराष्ट्रातील एकही प्रदेश अतिवृष्टीतून सुटला नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी अडचणीत आला आहे...याला शेतकरी जबाबदार आहे का? जागतिक तापमान वाढीमुळे असं होत आहे, असं अभ्यासक सांगत आहेत. याला शेतकरी जबाबदार नसताना शेतकऱ्यांनीच का भोगायचं? असा सवाल स्वाभिमानाचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला आहे. पंतप्रधानांकडून व्यक्त केली ही अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाच्या पाठीवर जाऊन ठामपणे मागणी केली पाहिजे..जे पर्यावरणाचा ऱ्हास करत आहेत, त्याच्याकडून निधी गोळा करून जे पर्यावरण संतुलनासाठी काम करतात, त्यांना द्यायला पाहिजे, असं राजू शेट्टी म्हणाले. शरद पवार यांच्या भूमिकेवरही तिरकस भाष्य ऊस तोडणी कामगारांनी आंदोलनाची हाक दिल्यानंतर काही नेत्यांनी पुढाकार घेतला आणि त्यांचा प्रश्न सोडविला. मग शेतकऱ्यांना भाव मिळावा म्हणून का कोणी पुढाकार घेत नाही ? असा सवाल करत राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे.
Published by:Akshay Shitole
First published: