मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /सातऱ्यात गोळीबार! दोन ठार तर एक गंभीर; आरोपी ठाण्यातील माजी नगरसेवक

सातऱ्यात गोळीबार! दोन ठार तर एक गंभीर; आरोपी ठाण्यातील माजी नगरसेवक

आरोपी ठाण्यातील माजी नगरसेवक

आरोपी ठाण्यातील माजी नगरसेवक

सातारा जिल्ह्यात पैशाच्या वादातून माजी नगरसेवकाने केलेल्या गोळीबारातून दोन ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Satara, India

सातारा, 19 मार्च : काही तासांपूर्वीच नाशिक शहरात भरदिवसा गोळीबाराची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात गोळीबार झाला आहे. यात दोनजण जागीच ठार झाले असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. पैशाच्या वादातून ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तो माजी नगरसेवक असल्याचं सांगितलं जात आहे.

काय आहे घटना?

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात गुरेघर धरण परिसरात माजी नगरसेवकाने गोळीबार केला. यात दोनजण ठार झाले असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. मदन कदम असं आरोपीचं नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ठाणे शहरातील माजी नगरसेवक म्हणून मदन कदम यांची ओळख आहे. पवनचक्की मधील पैशांच्या हिशोबावरुन वाद झाल्याने गोळीबार केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पाटण तालुक्यातील मोरणा विभागात घटना घडली. गोळीबार झाल्याने पाटण तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

वाचा - बापानं आयुष्यभर कमवलेले पैसे, दागिने मुलीने एका झटक्यात चोरलं, काय आहे प्रकरण

नाशिकमध्येही अशीच घटना

शहरातील सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कार्बन नाका परिसरात गोळीबार झाल्याची माहिती मिळाली आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरातील व्यवसायिक व नागरिकांमध्ये देखील प्रचंड घबराटीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि गुन्हे शाखेचं पथक घटनास्थळी दाखल झालं. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानंतर वसुलीच्या वादातून हा प्रकार घडल्याचं समोर येत आहे. पैसे वसूल करण्यासाठी एकाला अडवून त्याच्या दिशेने गोळी झाडण्यात आल्याचं समोर आलं आहे. या घटनेत एक जण जखमी असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कार्बन नाका परिसरात महिंद्रा सोना कंपनी समोर दोन कार एकमेकांसमोर आल्यानंतर एकाने गोळी झाडली. पूर्ववैमनस्यातून हा जीवघेणा हल्ला झाला. जुन्या वादातून तिघांनी तरुणावर गोळीबार तसेच कोयत्याने वार केले. यानंतर मारेकऱ्यांनी आपले वाहन घटनास्थळी सोडून कामगाराला धाक दाखवत त्याच्या दुचाकीने पळ काढला. ही सिनेस्टाईल घटना रविवारी दुपारी घडली.

First published:

Tags: Crime, Satara