S M L

ईव्हीएम मशीन्स जाणीवपूर्वक बंद पाडल्यात-प्रकाश आंबेडकर

Sachin Salve | Updated On: May 28, 2018 05:30 PM IST

ईव्हीएम मशीन्स जाणीवपूर्वक बंद पाडल्यात-प्रकाश आंबेडकर

गोंदिया, 28 मे : ईव्हीएम मशीन्स जाणीवपूर्वक बंद पाडण्यात आल्याचा आरोप भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

भंडारा गोंदिया लोकसभा पोडनिवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. मात्र, सकाळपासून अनेक मतदान केंद्रात ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाडाच्या घटना घडल्यात. आधीच विरोधकांनी ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे. आज अचानक ईव्हीएममध्ये बिघाड झाल्यामुळे विरोधकांनी आक्षेप घेतलाय.

ईव्हीएम मशीन्स जाणीवपूर्वक बंद पाडण्यात आले आहे. गोंदियात एकूण ४५० ईव्हीएम मशीन्स बंद असल्याचंही त्यांनी म्हटलंय. या गोंधळाबाबत निवडणूक आयोगाचे मेंटनन्स अधिकारी काय करताहेत असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.तापमानामुळे मशीन बंद पडतायेत असं मला वाटत नाही, एकतर आपल्या देशात मतदानाची टक्केवारी कमी असते. त्यात मशीन बंद पडले तर कसं चालेल असंही आंबेडकर म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 28, 2018 05:30 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close