Home /News /news /

मुलगा गेला तरी बेहत्तर पण आंदोलन सुरूच राहणार, शाहीन बाग आंदोलनकर्तीचा निश्चय

मुलगा गेला तरी बेहत्तर पण आंदोलन सुरूच राहणार, शाहीन बाग आंदोलनकर्तीचा निश्चय

कडाक्याची थंडी असतानाही महिलांनी आंदोलन मागे घेतले नाही

    नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी : गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून दिल्लीतील शाहीन बाग येथे CAA आणि  NRC विरोधात महिलांनी आंदोलन पुकारले आहे. अनेक दिवसांपासून रात्रीच्या थंडीतही महिला रस्त्यावर आपल्या मागणीसाठी लढा देत आहेत. सध्या वातावरणातील बदलामुळे अचानक थंडीचा कहर वाढत आहे. मात्र अशाही परिस्थितीत महिलांनी आंदोलन मागे घेतले नाही. शाहीन बाग आंदोलनातील नाझिया या महिलेचा 4 महिन्यांच्या बाळाचा आंदोलनादरम्यान मृत्यू झाला. यामुळे नाझिया व तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. दिल्लीतील थंडी सहन न झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. माझ्या मुलाला इतर काही आजार नव्हता मात्र त्याला बाहेरील थंड़ी सहन न झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे शाहीन बाग आंदोलनातील नाझिया या महिलेने व्य़क्त केले. मात्र मुलगा गेला तरी बेहत्तर मात्र आम्ही देशासाठी पुकारलेले आंदोलन थांबविणार नसल्याचे नाझियाने सांगितलं. आमच्याकडे भारतीयत्व सादर करण्यासाठी कोणतेच पुरावे नाही. आम्ही काय करणार? पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि गृहमंत्री अमित शहाजी यांना आमची विनंती आहे की त्यांनी CAA आणि NRC मागे घ्यावं. आम्ही भारताचे नागरिक आहोत आणि आम्हाला येथे राहायंच आहे, अशी भावना तिने व्यक्त केली. काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या शाहीन बाग (Shaheen Bagh) येथे सीएएच्या निषेधाच्या (CAA Protests) विरोधात एका व्यक्तीने गोळीबार केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबाराच्या वेळी आरोपी ‘जय श्री राम’ च्या घोषणा देत होता. पोलीस चौकशीत आरोपीने आपले नाव कपिल गुर्जर असे सांगितले असून तो पूर्व दिल्लीतील दल्लूपुरा येथील रहिवासी आहे. चौकशीमध्ये आरोपीने पोलिसांना सांगितले की, 'या देशात केवळ हिंदूच चांगले काम करतील.' भाजप नेता रावणाच्या पोटी जन्मलेला, बापूंविरोधातील वक्तव्यामुळे संसदेत खळबळ
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या