मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /भारीच आहे! लग्नाला आला नाहीत तरी आहेर पाहिजे बुवा; वधु-वरांनी लग्नपत्रिकेतच लढवली नवी शक्कल

भारीच आहे! लग्नाला आला नाहीत तरी आहेर पाहिजे बुवा; वधु-वरांनी लग्नपत्रिकेतच लढवली नवी शक्कल

पहिल्यांदाच या प्रकारचा प्रयोग करण्यात आला आहे.'

पहिल्यांदाच या प्रकारचा प्रयोग करण्यात आला आहे.'

पहिल्यांदाच या प्रकारचा प्रयोग करण्यात आला आहे.'

नवी दिल्ली, 18 जानेवारी : कोरोना काळामध्ये (Coronavirus) अनोख्या पद्धतीचे विवाहसोहळे आपल्याला पाहायला मिळाले. कोरोनाच्या काळात कमीत-कमी पाहुण्यांमध्ये लग्न लावण्यात यावी असे नियम सरकारने लागू केले आहेत. त्यामुळे अनेक जण ऑनलाईन पद्धतीने, तसंच कमी लोकांच्या उपस्थितीत लग्न लावत आहेत. कोरोनामुळे विवाहाचे वेगवेगळे ट्रेंड पाहायला मिळत आहेत. अशामध्ये एका अनोख्या विवाह सोहळ्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.

कोरोना काळात चेन्नईतल्या मदुरै येथे एक अनोख्या पद्धतीचा विवाहसोहळा पार पडला. लग्न समारंभात पाहुण्यांना वधूला गिफ्ट देता यावे किंवा पैशांचा आहेर करता यावा यासाठी एक अनोखी शक्कल लढवण्यात आलीये. वधूच्या कुटुंबीयांनी लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेवरच गुगल पे आणि फोन पेचा क्युआर कोड (QR Code ) छापला होता. जेणे करुन पाहुण्यांना वधूला आहेर देणे सोपे जाईल. कोरोना महामारीमध्ये लग्नसोहळ्यात उपस्थित राहिलेल्या पाहुण्यांना आणि ज्यांना लग्नाला येता आले नाही त्यांना वधूला गिफ्ट देणे सोपे जावे यासाठी वधूच्या कुटुंबीयांनी लग्न पत्रिकेवर क्युआर कोड छापत अनोख्या पद्धतीचा वापर केला. जेणे करुन पाहुणे गुगल पे आणि फोन पे च्या माध्यमातून थेट बँकेमध्ये आहेरचे पैसे ट्रान्सफर करु शकतील.

वधूची आई टी. जे. जयंती यांनी सांगितले की, 'जवळपास 30 जणांनी या पर्यायाचा वापर करुन माझ्या मुलीला लग्नामध्ये भेट दिली. तसंच, आमच्या कुटुंबात पहिल्यांदाच या प्रकारचा प्रयोग करण्यात आला आहे.' जयंती मदुरै येथे जननी ब्युटी पार्लर चालवतात. हा अनोखा विवाहसोहळा रविवारी पार पडला. या लग्नाची निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली.

हे ही वाचा-MBA नंतर बडी कंपनी सोडून परतला गावात; उच्चशिक्षित तरुणानं असं घडवलं सत्तांतर

जयंती यांनी पुढे सांगितले की, 'मला याबाबत बऱ्याच जणांचे फोन आहे. अशाच पद्धतीचे फोन माझा भाऊ आणि कुटुंबातील इतर सदस्यांना सोमवार सकाळपासून येत आहेत.' चेन्नईत पार पडलेल्या या अनोख्या विवाह सोहळ्याची चर्चा जोरदार होत आहे. कोरोना विषाणूचा प्रसार थांबवण्यासाठी लग्नसोहळ्यात अशा प्रकारचा प्रयोग करण्याची ही पहिलीच घटना आहे.

कोरोना महामारीच्या काळामध्ये लग्न समारंभ किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमांमध्ये ऑनलाईनपासून ते टेक्नॉलॉजीच्या मदतीने अनेक नवनवीन कल्पनांचा वापर करण्यात आला आहे. मागच्या महिन्यात एका नवविवाहित जोडप्याने आपल्या लग्नसोहळ्याला ऑनलाईन उपस्थिती लावलेल्या नातेवाईक आणि मित्रपरिवाराला त्यांच्या घरी जेवणाची डिलिव्हरी केली होती. या लग्नसोहळ्याची देखील जोरदार चर्चा झाली होती.

First published:

Tags: Google, Marriage