नवी दिल्ली 14 सप्टेंबर: कोरोना संकटाच्या (Coronavirus in India) काळात देशात लाखो तरुणांची नोकरी गेली (Job Loss). अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची कपात केली. कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्यात आली. लॉकडाऊमुळे (Lockdown) सगळ्यांचं आर्थिक गणितच कोलमडून गेलं अशा काळात लोकांना Employees Provident Fund (EPF)ची मदत झाली. 25 मार्च ते 31 ऑगस्ट या काळात देशभर ईपीएफ मेंबर्स (EPF Members)नी तब्बल 39 हजार कोटी रुपये काढले अशी माहिती आज लोकसभेत देण्यात आली.
यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. महाराष्ट्रात कर्मचाऱ्यांनी 7,837.85 कोटी रुपये काढले आहे. कर्जाचे हफ्ते चुकवणं आणि घरं चालविण्यासाठी या पैशाचा उपयोग करण्यात आला. कर्नाटक (Karnataka) 5,743.96 कोटी तमिळनाडू (Tamil Nadu) आणि पाँडीचेरीत 4,984.51 कोटी काढण्यात आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.