दुधाची प्लास्टिक पिशवी बंद होणार नाही -रामदास कदम

दुधाची प्लास्टिक पिशवी बंद होणार नाही -रामदास कदम

पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दुधाच्या पिशव्यावर बंदी घालणार नसल्याचं जाहीर केलं असून दूध दरवाढही त्यांनी फेटाळून लावली आहे.

  • Share this:

मुंबई, 10 डिसेंबर - प्लास्टिक बंदीमुळे दूध पिशव्यांचा गहन प्रश्न निर्माण झाला होता. वितरकांनी मोठी दरवाढ होण्याची भीती व्यक्त केली होती. मात्र, ही शक्यता पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सोमवारी फेटाळून लावली. तसेच दूध दरवाढही फेटाळून लावली असून, दुधाच्या पिशव्यावर बंदी घालणार नाही असं त्यांनी जाहीर केलं. पंढरपूर दौऱ्यावर आले असताना कदम यांनी हा निर्णय जाहीर केला. यामुळे वितरक, उत्पादक आणि ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

प्लास्टिक बंदीबाबत फडणवीस सरकारचं एक पाऊल मागे घेत दुधासाठी वापल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या बंद करण्यात येणार नसल्याचं पर्यावरणमंत्री रामदास कदमांनी सांगितलं. मात्र त्यासाठी काही अटी आणि नियम घालून त्यावर नियंत्रण मिळविले जाणार असल्याचं ते म्हणाले. तसेच या निर्णयामुळे भविष्यात जी दूध दरवाढ होणार होती ती होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

पंढरपूर दौऱ्यावर आलेल्या कदम यांनी वितरक, उत्पादक आणि ग्राहकांना दिलासा दिला. ग्राहकाने दूध पिशवी घेताना वितरकाकडे 50 पैसे डिपॉझिट ठेवायचे, पिशवी जमा केली की त्याला पैसे परत मिळतील. परदेशात अशाच प्रकारे वितरण केले जाते. उद्या या संदर्भात मुंबईमध्ये बैठक बोलविल्याण आली असल्याचं कदम यांनी सांगितले.

...तर दुधाचे दर प्रतिलीटर 10 ते 15 रुपयांनी महागले असते

राज्य सरकारने प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी सुरू केल्याने दुधाच्या विक्रीचा प्रश्न राज्यात ऐरणीवर आला होता. 'दूध विक्रीसाठी प्लास्टिक बंदीचा निर्णय मागे न घेतल्यास बाटलीत दूध द्यावे लागेले असेत. त्याकरिता ग्राहकांना दुधासाठी प्रतिलिटर 10 ते 15 रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागला असता. प्लास्टिक बंदीबाबत योग्य निर्णय न घेतल्यास राज्यात दूध उत्पादक आंदोलन करतील असा इशारा राज्य दूध कल्याणकारी आणि खासगी दूध उत्पादकांनी दिला होता.

राज्यातील दूध उत्पादकांचे ३० ऑक्टोबरपासून सुमारे सव्वादोनशे कोटी रुपयांचे बील सरकारकडे थकले आहे. आता सरकारने नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी अशा तीन महिन्यांसाठी पुन्हा प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची नवी योजना लागू केली आहे. सरकारने ३० ऑक्टोबरपर्यंतची रक्कम दिली नाही तर एक नोव्हेंबरपासून शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या गायीच्या दूधासाठी प्रतिलिटर २५ रुपये दर देणार असलो तरी त्यांच्या हातात थेट २० रुपये प्रमाणे रक्कम देणार आहोत. सरकार जेव्हा पाच रुपये अनुदान देईल त्यानंतर आम्ही उर्वरित पाच रुपयांप्रमाणे शेतकऱ्यांना रक्कम देऊ असा निर्णयही दूधउत्पादक संघाच्या बैठकीत घेण्यात आला होता.

 VIDEO : फॅन, टीव्ही, वेगळं टाॅयलेट अशी असेल मल्ल्याची कोठडी

First published: December 10, 2018, 8:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading