संघातून वगळल्यानंतर फिरकीपटूने सुरू केली वेगवान गोलंदाजी, पाहा VIDEO

राष्ट्रीय संघातून वगळल्यानंतर फिरकीपटूने काउंटी स्पर्धेत खेळताना चक्क वेगवान गोलंदाजी केली.

News18 Lokmat | Updated On: Aug 20, 2019 08:07 PM IST

संघातून वगळल्यानंतर फिरकीपटूने सुरू केली वेगवान गोलंदाजी, पाहा VIDEO

लंडन, 20 ऑगस्ट : ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅशेस मालिकेत इंग्लंडनं फिरकीपटू मोईन अलीला दुसऱ्या कसोटीसाठी संघात घेतलं नाही. पहिल्या कसोटीत त्याला संधी देण्यात आली होती. त्यानंतर दोन टी20 सामन्यासाठी आपण उपलब्ध नसल्याचं सांगणाऱ्या मोईन अली काउंटी चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी मैदानात उतरला आहे. वोर्सेस्टरशायरकडून खेळणारा हा फिरकीपटू जवळपास एक वर्षानं काउंटी क्रिकेट केळत आहे.

काउंटी चॅम्पियनशिप स्पर्धेत मोईन अलीने नॉर्थप्टनशायरविरुद्ध गोलंदाजी केली. या सामन्यात फिरकीपटू गोलंदाज असलेल्या मोईनने वेगवान गोलंदाजी केली. सामन्याच्या तिसऱ्या दिवसी त्याच्या संघाचा वेगवान गोलंदाज जोश टोंग्यू मैदानावर उतरू सकला नाही. त्यानंतर मोईन अलीने वेगवान गोलंदाजीची जबाबदारी सांभाळली. त्याला एकही विकेट गेता आली नाही. त्यानंतर मोईनने फिरकी गोलंदाजी करताना तीन गडी बाद केले. त्यानं तीन विकेट घेण्यासाठी 126 धावा दिल्या.

अॅसेस मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंडला अजून तीन सामने खेळायचे आहेत. ही मालिका 16 सप्टेंबरला संपणार आहे. मोईन अली बद्दल वोर्सेस्टरशायर संघाचे प्रशिक्षक अॅलेक्स गिड्मॅन यांनी सांगितंल की, तो जेव्हाही मैदानावर उतरतो तेव्हा इतर खेळाडूंना प्रेरणा देतो. आम्हाला सर्वांना आशा आहे की मोईन लवकरच इंग्लंडच्या संघात खेळताना दिसेल.

मोईन अलीने या हंगामात आयर्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध फक्त दोनच कसोटी खेळल्या आहेत. यातील चार डावात त्यानं 13 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध अलीने पहिल्या डावात एक आणि दुसऱ्या डावात दोन गडी बाद केले होते.

Loading...

सोसायटीत गाडी लावताय तर सावधान, पाहा या भुरट्या चोराचा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 20, 2019 03:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...