News18 Lokmat

फक्त 25 चेंडूत झंझावाती शतक, पाहा तुफान फटकेबाजी

25 चेंडूतील तुफान फटकेबाजीच्या जोरावर संघाने 10 षटकांत 176 धावा केल्या.

News18 Lokmat | Updated On: Mar 22, 2019 12:25 PM IST

फक्त 25 चेंडूत झंझावाती शतक, पाहा तुफान फटकेबाजी

ब्रिटन, 22 मार्च : क्रिकेटमध्ये दररोज नवनवे रेकॉर्ड होत असतात. जुन्या रेकॉर्डला मोडत नवे विक्रम खेळाडू करतात. आता इंग्लंडच्या अंडर 19 संघातील फलंदाजाने एका सामन्यात फक्त 25 चेंडूत झंझावाती शतक साजरे केले. इंग्लंडमध्ये सर्रे काउंटीकडून खेळताना विल जॅक्सने तुफान फटकेबाजी करत शतक केले. सर्रे काउंटी आणि लँकशायर यांच्यात झालेल्या टी10 सामन्यात त्याने ही कामगिरी केली.

विल जॅक्सने एकाच षटकात 6 षटकार मारले. त्याने अवघ्या 22 चेंडूत 98 धावा केल्या होत्या. त्यानंतरचे दोन चेंडू निर्धाव गेल्याने शतकासाठी 25 चेंडू लागले. जॅक्सने 30 चेंडूत 105 धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर सर्रे काउंटीने 10 षटकांत 3 बाद 176 धावा केल्या. जॅक्सच्या शतकी खेळीत 4 चौकार आणि 11 षटकारांचा समावेश होता.टी20 नंतर आता टी10 क्रिकेटची क्रेझ आली आहे. सध्या एमिरेट क्रिकेट बोर्ड या प्रकारच्या स्पर्धा आयोजित करत आहे. याला आयसीसीकडून मान्यता मिळाली आहे.

Loading...


VIDEO : सुर्यमुखी कार्यकर्त्यांनो, अजित पवारांनी टोचले कानबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 22, 2019 12:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...