S M L

विराटचं शतक वाया, इंग्लंडचा 31 धावांनी विजय

Updated On: Aug 4, 2018 05:17 PM IST

विराटचं शतक वाया, इंग्लंडचा 31 धावांनी विजय

इंग्लंड, 04 आॅगस्ट : विराट कोहलीने केलेल्या शानदार शतकाची खेळी वाया गेलीये. इंग्लंडने कसोटी सामन्यात भारताचा पराभव केलाय. इंग्लंडने भारतावर 31 धावांनी विजय मिळवलाय.

एजबेस्‍टनमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका पार पडत आहे. या मालिकेतील पहिला सामन्यात भारताला पराभवाचा धक्का बसलाय. इंग्लंडने अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 287 आणि 180 धावा केल्यात. तर विराट कोहलीने 149 धावांची दमदार खेळी करून 274 धावांचा टप्पा गाठला. चौथ्या दिवशी मात्र डाव पलटला टीम इंडियाचा निभाव लागू  न शकल्यामुळे 162 धावांवर संघ गारद झाला.

त्याआधी इंग्लंडची संपूर्ण टीम पहिल्या डावात फक्त २८७ धावा करू शकली. यानंतर भारताच्या शिखर धवन आणि मुरली विजय या सलामीच्या जोडीने संघाला चांगली सुरूवात करुन देण्याचा प्रयत्न केला. दोघांनी ५० धावांची भागिदारी केली. इंग्लंडच्या २० वर्षीय खेळाडू सॅम करणने सामन्याचे चित्र पालटवलं. सॅमने १४ व्या षटकाच्या चौथ्या बॉलवर मुरली विजयला बाद केले. मुरली फक्त २० धावा करु शकला. याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याने के.एल. राहुललाही बाद केले. राहुलने फक्त ४ धावा केल्या होत्या. पुढच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर शिखर धवनलाही २६ धावांवर माघारी पाठवले. सॅमने केवळ आठ चेंडूत भारताच्या तगड्या फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

पहिल्या डावात इंग्लंडने २८७ धावा केल्या होत्या. दरम्यान भारतीय संघाच्या ढिल्ल्या क्षेत्ररक्षणामुळे इंग्लंडला २८७ पर्यंत मजल मारता आली. दुसऱ्या दिवसाअखेरीस भारतीय संघाचे सर्व खेळाडू २७४ धावाकरुन बाद झाले.  अजिंक्य रहाणे आणि दिनेश कार्तिक यांनी दोन स्लिपचे झेल सोडले. सामन्या दरम्यान इंग्लंडच्या कीटन जेनिंग्‍स आणि सॅम करण या दोन खेळाडूंना जिवनदान मिळालं. जेनिंग्‍सच्या नऊ धावांवर असताना अजिंक्य रहाणेकडून त्याचा झेल चुकला. त्यानंतर सॅमच्या २४ धावा झाल्यावर भारताचा क्षेत्ररक्षक दिनेश कार्तिककडून परत झेल सुटला.

दुसऱ्या दिवसाअखेरीस भारतीय संघाचे सर्व खेळाडू २७४ धावाकरुन बाद झाले. भारताला हे दोन झेल चुकल्याचे महागात पडले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 4, 2018 05:17 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close