Elec-widget

क्रिकेट जगतात नवा वाद : ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मोईनला म्हणाला होता 'ओसामा'!

क्रिकेट जगतात नवा वाद : ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मोईनला म्हणाला होता 'ओसामा'!

2015 मध्ये जेव्हा इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अॅशेस कसोटी सुरू होती, तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या एका खेळाडूने मोईन अलीला 'ओसामा' असं म्हटलं होतं.

  • Share this:

इंग्लंडचा ऑलराउंडर क्रिकेट खेळाडू मोईन अली याने एका ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूवर त्याला मैदानात 'ओसामा' म्हटल्याचा आरोप आरोप केलाय. त्याचं झालं असं की, 2015 मध्ये जेव्हा इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अॅशेस कसोटी सुरू होती, तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या एका खेळाडूने मोईन अलीला 'ओसामा' असं म्हटलं होतं. आपल्या खेळाडूंवर असा आरोप केला गेला असल्याने ऑस्ट्रेलियाने ही गोष्ट गांभिर्याने घेतली असून, क्रिकेट जगतात निर्माण झालेल्या या वादातून आणखी काय नवीन समोर येतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टाइम्सच्या एका वृत्तानुसार, मोईन अली हा एक मुस्लिम असल्याने ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या तोंडातून 'ओसामा' असे शब्द निघाले. त्यावर मोईन अली म्हणाला होता की, जेव्हा मला त्याने 'ओसामा' या नावाने संबोधलं, तेव्हा माझा राग अनावर झाला होता. आणि असं पहिल्यांदाच घडलं, जेव्हा मैदानात असताना माल प्रचंड राग आला होता.

अलीने आणि त्याच्या सहकार्यांनी ही बाब ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर डॅरेन यांनी त्या खेळाडूला याबाबत विचारणा केली असता, तो असं असं काही बोबलाच नसल्याचं त्यानं स्पष्ट केलं. त्याच्या या प्रतिक्रियेनंतर अली आणखीनच चिडला. रागात भरात त्याने ९२ धावा केल्या आणि ५ विकेट घेतल्या खऱ्या. मात्र, तो सामना इंग्लंडने जिंकला होता.

क्रिकेट ऑस्ट्रेलिया ऑफिशिअलने शनिवारी cricket.com.au या वेबसाईटवर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाकडून त्या घटनेची शहानिशा करण्यास सांगण्यात आलंय. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंवर असा आरोप केला गेला असल्याने त्यांनी ही गोष्ट गांभिर्याने घेतली आहे. या प्रकरणातून आता आणखी काय नवीन समोर येतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 मुकेश अंबानींच्या गणपतीला बाॅलिवूड सितारे हजर, पहा फोटोज्

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 15, 2018 07:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...