Home /News /news /

धक्कादायक! पत्नीचा त्रास इंजिनिअर तरुणाला असह्य, क्षणात संपवलं आयुष्य

धक्कादायक! पत्नीचा त्रास इंजिनिअर तरुणाला असह्य, क्षणात संपवलं आयुष्य

घरातील सततच्या वादाला कंटाळून एका इंजिनिअरने (Engineer)आत्महत्या (Suicide) केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

    पश्चिमी सिंहभूम, 02 एप्रिल : घरात शांती आणि आनंदाचं वातावरण असले तर सगळं कुटुंब सुखी असतं. पण याच घरात जर भांडण, अविश्वास आणि तिरस्काराने जागा घेतली तर हसत्या-खेळत्या कुटुंबाची राख होण्यास क्षणही पुरेसा असतो. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरातील सततच्या वादाला कंटाळून एका इंजिनिअरने (Engineer)आत्महत्या (Suicide) केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संजय कुमार यादव असं मृत तरुणाचं नाव आहे. संजयचा मृतदेह सेलच्या क्वार्टरमध्ये सापडला. त्याने वैतागून गळफास घेत आत्महत्या केल्याचं पोलीस (Police) तपासात समोर आलं आहे. संजय हा कॉमन्स कंपनीमध्ये कामाला होता. रोज दारू पिण्यावरून जोडप्यात वाद व्हायचा आणि यातच सगळ्याला कंटाळून संजयने आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हा सगळा प्रकार झारखंडच्या पश्चिमी सिंहभूम इथे घडला आहे. पत्नी आणि दोन्ही मुलांना खोलीत बंद करून संपवलं आयुष्य पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, तिचा पती संजय हा दारूच्या आहेरी गेला होता. तो रोज दारूच्या नशेत घरी येऊन भांडण करायचा. बुधवारी रात्रीसुद्धा तो दारूच्या नशेत घरी आला आणि दोघांमध्ये वाद झाला. यानंतर रागाच्या भरात संजयने पत्नी आणि दोन्ही मुलांना खोलीत बंद केलं आणि दुसऱ्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येचा तपास सुरू पत्नी कशी तरी खोलीच्या बाहेर आली आणि तिने दुसऱ्या खोलीत पाहिलं तेव्हा पतीचा मृतदेह लटकत होता. ज्यानंतर तिने पोलिसांना घटनेची माहिती झाली. पोलिसांनी घटनास्थळावरून संजयचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर पुढील तपास सुरू आहे.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Suicide news

    पुढील बातम्या