मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

'नॅनो'चा प्रवास थांबणार ?,जूनमध्ये एकच कार बनली

'नॅनो'चा प्रवास थांबणार ?,जूनमध्ये एकच कार बनली

 जून 2017 मध्ये ही संख्या 275 होती. तर मागिल महिन्यात तीन कारची विक्री झाली. हाच आकडा माहील वर्षी 167 होता.

जून 2017 मध्ये ही संख्या 275 होती. तर मागिल महिन्यात तीन कारची विक्री झाली. हाच आकडा माहील वर्षी 167 होता.

जून 2017 मध्ये ही संख्या 275 होती. तर मागिल महिन्यात तीन कारची विक्री झाली. हाच आकडा माहील वर्षी 167 होता.

नवी दिल्ली, 05 जुलै : मध्यमवर्गासाठी मोठ्या गाजावाजा करत काढलेल्या टाटा नॅनोचं उत्पादन बंद होण्याची चिन्हं आहेत. जून महिन्यात गुजरातमधल्या फॅक्ट्रीमधून फक्त एक नॅनो बनली, अशी सूत्रांची माहिती आहे. तर जूनमध्ये देशभरात फत्त 3 नॅनो विकल्या गेल्या. परंतु, टाटा मोटर्सनं यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सर्वांना स्वस्त आणि किफायतशीर दरात कार वापरता यावी असं स्वप्न रतन टाटा यांनी पाहिलं आणि ते सत्यातही उतरवलं. जगातली सर्वात स्वस्त कार म्हणून नॅनोला मान मिळाला. पण, लोकांनी या कारकडे पाठ फिरवल्यामुळे नॅनोला ब्रेक लागला. गेल्या महिन्यात देशभरात फक्त 3 कारची विक्री झाली. टाटा मोटर्सने जून महिन्यात नॅनोचे कोणतेही निर्यात झाले नाही अशी घोषणा केली. जून 2018 मध्ये फक्त एकच नॅनो कार तयार करण्यात आली. जून 2017 मध्ये ही संख्या 275 होती. तर मागिल महिन्यात तीन कारची विक्री झाली. हाच आकडा माहील वर्षी 167 होता. टाटा मोटर्स नॅनोचे उत्पादन थांबवत आहेत का असा प्रश्न विचारला असता, टाटा मोटर्सचे प्रवक्त्यांनी याबद्दल असा कोणताह निर्णय झाला नाही. पण 2019 मध्ये नॅनोचे उत्पादन सुरू राहणार की नाही याची शक्यता कमी आहे. निर्यात थांबले टाटा मोटर्सच्या महत्त्वाकांक्षी नॅनो कारचे निर्यात या वर्षीच्या सुरुवातीपासून कोलमडले. विक्रेदारानी नॅनो कार टाटा मोटर्सकडे परत पाठवल्या आहेत. जर असंच सुरू राहिलं तर नॅनोचे उत्पादन पूर्णपणे बंद होऊ शकते.  सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्‍युफॅक्‍चर्स(सियाम) च्या माहितीनुसार, मागील वर्षी एप्रिल आणि डिसेंबर महिन्यात नॅनोच्या निर्यातीत 75 टक्यांनी घट झाला. याच दरम्यान 1798 कारच निर्यात झाल्यात. तर 2016 मध्ये हाच आकडा 6714 होता. जानेवारी 2018 च्यानंतर एकही नॅनो कार परदेशात पाठवण्यात आला नाही. टाटा मोटर्सने नेपाळ,श्रीलंका आणि बांग्लादेशमध्ये नॅनो कार लाँच केली होती. आता नेपाळमधून नॅनो कार मागे घेण्यात आलीये. तर बांग्लादेश आणि श्रीलंकेमध्ये अजून कार बाजारपेठेत आहे. मार्च तिमाही महिन्यात टाटा मोटर्सने निर्णय़ घेतलाय की, जर भविष्यात योग्य आणि आर्थिक गणित पाहूनच पुढे वाटचाल केली जाईल. जे माॅडेल जुने झाले आहेत ते बंद करण्यात येईल असंही टाटा मोटर्सने स्पष्ट केलंय. हेही वाचा Reliance AGM 2018: जिओबद्दल होऊ शकते मोठी घोषणा Buradi Case: धक्कादायक व्हिडिओ समोर, आत्महत्येची मिळून करत होते तयारी
First published:

Tags: Nano, Nano car, Tata moters, नॅनो

पुढील बातम्या