Elec-widget

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांचा पोलीस सेवेला राजीनामा, सेनेकडून विधानसभा लढवणार?

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांचा पोलीस सेवेला राजीनामा, सेनेकडून विधानसभा लढवणार?

1983 बॅचचे पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांची कारकीर्द वादातीत राहिली. शर्मा यांच्या नावावर एकूण 100 पेक्षा जास्त एन्काऊंटरची नोंद आहे. त्यांच्या धडाकेबाज कामगिरीवर "अब तक 56" चित्रपट साकारला होता.

  • Share this:

प्रशांत बाग, प्रतिनिधी

मुंबई, 18 जुलै : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा पोलीस सेवेतून निवृत्त होणार आहे. पोलीस सेवेतून बाहेर पडल्यानंतर ते राजकारणात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप शर्मा हे शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढवणार आहे. अंधेरी मतदारसंघातून ते संभाव्य उमेदवार आहे.

1983 बॅचचे पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांची कारकीर्द वादातीत राहिली. शर्मा यांच्या नावावर एकूण 100 पेक्षा जास्त एन्काऊंटरची नोंद आहे. त्यांच्या धडाकेबाज कामगिरीवर "अब तक 56" चित्रपट साकारला होता.

आता प्रदीप शर्मा हे राजकारणाच्या उंबरठ्यावर उभे आहे.  प्रदीप शर्मा यांनी पोलीस सेवेला राजीनामा दिला आहे. सध्या ते ठाणे खंडणी विरोधी पथक प्रमुख आहे. अनेक गुन्हेगारी टोळ्यांचे कर्दनकाळ म्हणून त्यांची ओळख आहे.

मध्यंतरीच्या काळात शर्मा हे 9 वर्ष पोलीस सेवेतून दूर होते.  90 च्या दशकात मुंबईमध्ये जेव्हा अंडरवर्ल्डने हातपाय पसरवले होते. तेव्हा पोलिसांनी अंडरवर्ल्ड राज संपवण्यासाठी एन्काऊंटर मोहीम हाती घेतली होती. मात्र, यानंतर एनकाऊंटरमध्ये सहभागी असलेले पोलीस अधिकारी वेगवेगळ्या गँगकडून सुपारी घेत असल्याचा आरोप होऊ लागला. 2006 मध्ये लखन भय्या एन्काऊंटर प्रकरण सुद्धा सुपारी किलिंग म्हणून झालं असा संशय निर्माण झाला होता.

Loading...

प्रदीप शर्मा यांना 2006 मध्ये लखन भैय्या फेक एन्काऊंटर प्रकरणी अटक करण्यात आली होती. या प्रकरणी सत्र न्यायालयाकडून त्यांना लगेच जामीनही मिळाला होता. पण, याच प्रकरणात सिनिअर पीआय प्रदीप सुर्यवंशीसह 13 पोलीस आणि इतर 8 जण दोषी आढळल्यामुळे प्रदीप शर्मा यांनी सेवेतून बडतर्फ करण्यात आलं होतं. न्यायालयातून मुक्तता झाल्यानंतर बडतर्फ निर्णयाला प्रदीप शर्मा यांनी आव्हान दिलं होतं आणि त्याचा निर्णय त्यांच्याच बाजूने लागला. त्यामुळे 2017 रोजी ते पुन्हा सेवेत रुजू झाले होते.

सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची धडाकेबाज कामगिरी सुरूच होती. खंडणी प्रकरणात शर्मा यांनी अंडरवर्ल्ड डाॅन  दाऊद इब्राहीमचा भाऊ इब्राहिम कासकर यालाही अटक केली होती.

======================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 18, 2019 11:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...