धक्कादायक! मतदान केंद्रावरच कर्मचाऱ्याचा मृत्यू

धक्कादायक! मतदान केंद्रावरच कर्मचाऱ्याचा मृत्यू

भगवान मगरे मीनल अर्जुन विद्यालय सी ब्लॉक या मतदान केंद्रवर कामावर होते.

  • Share this:

गणेश गायकवाड, प्रतिनिधी

उल्हासनगर, 28 एप्रिल : उल्हासनगरमध्ये मतदान केंद्रावरच कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मतदान केंद्रावर कामावर असताना अचानक ते खाली कोसळले. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

29 एप्रिलला महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी चौथ्या आणि अंतिम टप्प्यासाठी मतदान होणार आहे. त्यासाठी सर्वच मतदान केंद्रावर मतदानाची तयारी सुरू आहे. त्यावेळी कामावर असताना भगवान मगरे या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवान मगरे मीनल अर्जुन विद्यालय सी ब्लॉक या मतदान केंद्रवर कामावर होते. ते दुपारी जेवले आणि सावलीत बसले होते. पण अचानक त्यांना भुरळ आली आणि ते खाली कोसळले. ते खाली कोसळताच त्यांना तात्काळ नजिकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

दरम्यान, भगवान मगरे यांच्या मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्य़ू झाला असावा असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांकडून वर्तवण्यात आला आहे. तर पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

VIDEO : 'मीच माफी मागतो', राहुल गांधींना 'असा' सोडवला सुरक्षारक्षक-पायलटमध्ये झालेला वाद

First published: April 28, 2019, 5:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading