मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

आयुष्यातील संकटांना न जुमानता जो पुढे जातो, तोच खरा सिकंदर! हात नसलेल्या मुलाचा VIDEO तुम्हाला खूप काही शिकवेल

आयुष्यातील संकटांना न जुमानता जो पुढे जातो, तोच खरा सिकंदर! हात नसलेल्या मुलाचा VIDEO तुम्हाला खूप काही शिकवेल

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक अपंग मुलगा शाळेच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. दोन्ही हात नसतानाही तो कोणावर अवलंबून न राहाता, तो स्वत: अन्न खात असल्याचे तुम्ही पाहू शकता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Devika Shinde

मुंबई 1 सप्टेंबर : आयुष्य म्हटलं की संकटं देखील आपोआप येणार. पण त्या संकटातून रस्ता काढत जो पुढे जातो, त्याला खरं आयुष्य जगण्याचं मंत्र सापडलं असं म्हणालायला हरकत नाही. कारण आपल्या समोर येणाऱ्या अडथळ्यांना न जुमानता जे लोक पुढे जातात, ते लोक आनंदी जीवन जगतात. यासंबंधी एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून तुमच्या डोळ्यात नक्की पाणी येईल.

हा व्हिडीओ एका लहान मुलाचा आहे, ज्याला हात नाही आहे. पण तरी देखील तो यातून रस्ता काढत आपलं जेवण जेवत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला देखील असं वाटेल की, आपल्या जवळ जे नाहीय, त्याचं दुखं करत बसण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे, त्यात समाधानी राहावं. मगच आपल्याला आनंदी राहाता येईल आणि या मुलानं देखील तेच केलं.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक अपंग मुलगा शाळेच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. दोन्ही हात नसतानाही तो कोणावर अवलंबून न राहाता, तो स्वत: अन्न खात असल्याचे दिसते. या लहान मुलाला हाताचा पंजा नाही. त्यामुळे तो हे करण्यासाठी, त्याचे अपंग हात वापरतो.

हे वाचा: आश्चर्य! पायाच्या जागी 'शिंग' आणि प्रायव्हेट पार्टच नाहीत; विचित्र बाळाला पाहताच डॉक्टरांनी...

पुढे व्हिडीओमध्ये तो सर्व मुलांसोबत रांगेत उभे असताना प्रार्थना करत असल्याचे दिसत आहे. यादरम्यान तो दोन्ही पायांनी देखील अपंग असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. परंतु तो या सगळ्यामुळे हार न मानता आनंदी राहात आहे हे खूपच कौतुकास्पद आहे.

हे वाचा: खतरनाक! चिमुकलीच्या हातातील खेळणं पाहून भल्याभल्यांना फुटला घाम; असं आहे तरी काय पाहा VIDEO

हा व्हिडीओ सोशल मीडिया अकाउंट उम्दा_पंक्तियां या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. ज्यावर लोकांनी देखील जोरदार कमेंट केल्या आहेत.

First published:

Tags: School children, Small child, Top trending, Viral videos