मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

'माझ्या गाडीचा आवाज ऐकताच छकुली रडायला लागते, पण तरीही तिला जवळ घेता येत नाही'

'माझ्या गाडीचा आवाज ऐकताच छकुली रडायला लागते, पण तरीही तिला जवळ घेता येत नाही'

आठ तास आयसोलेशन वॉर्डमध्ये काम केल्यानंतर घरात कोणालाही हात लावता येत नाही. त्यामुळे माझी छकुली रडली तरी तिला जवळ घेता येत नाही.

आठ तास आयसोलेशन वॉर्डमध्ये काम केल्यानंतर घरात कोणालाही हात लावता येत नाही. त्यामुळे माझी छकुली रडली तरी तिला जवळ घेता येत नाही.

आठ तास आयसोलेशन वॉर्डमध्ये काम केल्यानंतर घरात कोणालाही हात लावता येत नाही. त्यामुळे माझी छकुली रडली तरी तिला जवळ घेता येत नाही.

अकोला, 05 एप्रिल : 'माझी छकुली आता दीड वर्षाची होत आली. सध्या तिला सगळ्यात जास्त गरज माझी आहे. पण माझी इच्छा असूनही तिला जवळ घेता येत नाही' हे शब्द वाचायलाही जड जातात पण हे सत्यात एका मातेसोबत घडत आहे. आपल्याला कोरोनाच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी घरात बसण्याचं आवाहन केलं असताना आपल्या जीवाची परवा न करता डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय, पोलीस, सफाई कामकार सगळेच आपल्यासाठी झटत आहेत. या कोरोनामुळे त्यांच्या आयुष्यावर खूप परिणाम झाला आहे. एका वृत्तपत्राने या परिचारिकेशी संवाद साधला आणि त्यांची परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या परिचारिकेने सांगितलं की, 'सध्या मी माझ्या छकुलीला शेजाऱ्यांकडे सोपवते आणि 8 तासाच्या शिफ्टसाठी जाते. आठ तास आयसोलेशन वॉर्डमध्ये काम केल्यानंतर घरात कोणालाही हात लावता येत नाही. त्यामुळे माझी छकुली रडली तरी तिला जवळ घेता येत नाही. खरंतर रुग्णालयातून आल्यानंतर घरात अंतर ठेवणं गरजेचं आहे.' खरंतर, कोरोनाच्या संकटामध्ये सगळा जमाज ढवळून निघाला आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात यामुळे बदल झाला आहे. याचा सगळ्यात मोठा परिणाम आरोग्य विभागावर झाला आहे. अगदी डॉक्टरांपासून ते वॉर्डबॉयपर्यंत सगळेच या रोगाला सामोरे जात आहेत. आपल्या घराची, कुटुंबाची तमा न बाळगता देशासाठी लढणारे हे खरे योद्धा आहेत. आळी-पाळीने ड्यूटी करतात. संपूर्ण आठ तास कोरोनाबाधित रुग्णाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये काम करतात. यानंतरही घरी गेल्यानंतर कुटुंबाशी फारसा संवाद करता येत नाही. समाजाचा दृष्टीकोन बदलल्याची खंत कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी आम्ही जीवाची परवा न करता मैदानात उतरलो आहोत. या लढ्यामध्ये सगळ्यात जास्त ताकद आम्हाला कुटुंबियांपासून मिळते. पण आम्ही आरोग्य विभागात काम करतो, त्यातही कोरोना रुग्णांच्या सोबत असतो म्हणून आम्हाला किंवा आमच्या कुटुंबाला कोरोना झाला असल्याच्या गैरसमज करून आमच्यासोबत वेगळं वागणं योग्य नाही.
Published by:Manoj Khandekar
First published:

Tags: Corona

पुढील बातम्या