मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

Alert! देशात नव्या पद्धतीने होतोय सायबर घोटाळा, वाचण्यासाठी हे लक्षात ठेवा

Alert! देशात नव्या पद्धतीने होतोय सायबर घोटाळा, वाचण्यासाठी हे लक्षात ठेवा

ई-मेल खंडणी मोहिमेतील फसवणूक करणार्‍यांनी कॉम्प्यूटर हॅक करून अनेकांना लुटलं आहे.

ई-मेल खंडणी मोहिमेतील फसवणूक करणार्‍यांनी कॉम्प्यूटर हॅक करून अनेकांना लुटलं आहे.

ई-मेल खंडणी मोहिमेतील फसवणूक करणार्‍यांनी कॉम्प्यूटर हॅक करून अनेकांना लुटलं आहे.

  • Published by:  Manoj Khandekar
नवी दिल्ली, 03 मे : देशाच्या सायबर सिक्युरिटी एजन्सीने 'खोट्या' ई-मेल घोटाळ्याबद्दल इंटरनेट वापरकर्त्यांना सतर्क केलं आहे. ज्यात वापरकर्त्याचा खासगी व्हिडिओ रेकॉर्ड करणं आणि खंडणीची रक्कम क्रिप्टो चलनात (Crytpo Currency)जमा न केल्यास धमकावणं असा प्रकार घडत आहे. कॉम्प्यूटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने (CERT-In) आपल्या एका ताज्या अहवालात म्हटलं आहे की, अशा ई-मेलची भीती बाळगण्याची गरज नाही, परंतु जर त्यांच्या सोशल मीडिया किंवा इतर कोणत्याही ऑनलाइन प्लॅटफॉर्ममध्ये छेडछाड लक्षात आली तर तात्काळ तुमचा पासवर्ड बदलला पाहिजे. बनावट ई-मेलला घाबरू नका ई-मेल खंडणी मोहिमेतील फसवणूक करणार्‍यांनी कॉम्प्यूटर हॅक करून अनेकांना लुटलं आहे. वेबकॅमच्या सहाय्याने व्हिडिओ तयार केला त्यातून त्यांना अनेक जणांचा पासवर्ड समजल्याचंही सांगण्यात येत आहे. हे ईमेल बनावट आहेत पण त्यामुळे घाबरून जाऊन नका तर सीईआरटी-इन हे सायबर हल्ल्यापासून वाचण्यासाठी आणि भारतीय सायबर स्पेसचे संरक्षण करण्यासाठी काम करत आहेत. अशा प्रकारे होते फसवणूक एजन्सीने याबद्दल माहिती देताना अशाच एका 'खंडणी' ई-मेलचा उल्लेख केला आहे. प्रथम फसवणूक करणारा मेल पाठवून जुना पासवर्ड लिहितात आणि त्याचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात. मग वापरकर्त्यास पटवून देण्यासाठी ते कॉप्यूटरच्या भाषेत काहीतरी माहिती देतो. मग असे वृत्त येतं की हॅकरने अश्लील वेबसाइटवर मालवेयर लावला आहे आणि वापरकर्ता व्हिडिओ पाहत असताना त्याचा वेबकॅम आणि डिस्प्ले स्क्रीन हॅक केली जाते. त्यानंतर मेसेंजर, फेसबुक आणि ईमेलमधील सर्व संपर्कांमध्ये छेडछाड केली जाते. यानंतर ते सगळे पासवर्ड हॅक करतात आणि खंडणी मागतात. त्यानंतर फसवणूक करणारा बिटकॉइन (क्रिप्टोकरन्सी) मध्ये खंडणी मागतो. आणि तसं नाही केल्यास वारकर्त्याला धमकीही देण्यात येते. त्यामुळे असं जर काही झालं तर तात्काळ तुमचे पासवर्ड बदला.
First published:

पुढील बातम्या