'एलफिन्स्टन रोड' स्टेशन आता या नावाने आेळखले जाणार!

'एलफिन्स्टन रोड' स्टेशन आता या नावाने आेळखले जाणार!

  • Share this:

मुंबई, ता. 17 जुलै – ‘एलफिन्स्टन रोड’ स्टेशनचं ब्रिटीशकालीन नाव उद्या  (18 जुलैच्या) मध्यरात्रीपासून इतिहासजमा होणार आहे. ते आता ‘प्रभादेवी’ या नावाने ओळखले जाईल. ‘एलफिन्स्टन रोड’ स्टेशनचं नाव बदलण्याची मागणी शिवसेनेनं केली होती, ती प्रशासनाने मान्य केली आहे.

औरंगाबादमध्ये विद्यार्थ्यांना ओलांडावा लागतो ‘मृत्यू’चा ट्रॅक

सिंचन घोटाळ्याप्रकरणी आणखीन दोघांवर गुन्हे दाखल!

मुंबईच्या ह्रदयस्थानी मध्य रेल्वे मार्गावरील हे महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानक. 1853 ते 1860 या काळात बॉम्बे प्रेसिडेन्सी चे गव्हर्नर राहिलेले लॉर्ड एलफिन्स्टन याचं नावं या स्टेशनला दिलं गेलं होतं. काळाच्या ओघाता ते आता मागे पडणार असून, 18 जुलैच्या मध्यरात्रीपासून हे रेल्वे स्थानक ‘प्रभादेवी’ या नावाने ओळखले जाणार आहे. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने या रेल्वे स्थानकावर होणाऱ्या उद्घोषणा, तसेच या रेल्वे स्थानकावरुन ये-जा करणाऱ्या सर्व उपनगरीय गाड्यांमधील उद्घोषणामध्ये व इंडीकेटर्समध्ये ‘एलफिन्स्टन रोड’ ऐवजी ‘प्रभादेवी’ असा बदल करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत.

VIDEO: विद्यार्थिनीवर अतिप्रसंग करणाऱ्याला 

राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाणांचं नाव 

‘एलफिन्स्टन रोड’ स्टेशनचं नाव बदलण्याची मागणी शिवसेनेनं केली होती. यासंदर्भात अधिक माहिती देताना शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत म्हणाले की, सेनेचे नेते दिवाकर रावते यांनी हा मुद्दा उचलून धरला होता. मी तो लोकसभेत सुद्धा मांडला होता. आणि आम्ही त्याचा सातत्याने पाठपुरावाही केला. मुंबई सेंट्रलला नाना शंकर शेठ यांचं नाह देण्यात यावं, ग्रँटरोडला गावदेवी स्टेशन या मागण्यासुद्धा आम्ही केल्या होत्या. त्यापैकी ‘एलफिन्स्टन रोड’ स्टेशनचं नाव बदलण्याची मागणी मान्य झाली आहे. निश्चितच हा निर्णय कौतुकास्पद आहे.

VIDEO: विद्यार्थिनीवर अतिप्रसंग करणाऱ्याला 

VIDEO: ...जेव्हा नागपूरात माथेफिरू चाकू घेऊन पर्यटकांच्या मागे 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 17, 2018 09:49 PM IST

ताज्या बातम्या