मुंबई, 09 जानेवारी : संपूर्ण जगभरात अनेक विचित्र घटना घडत असतात. काही ठिकाणी विचित्र व्यक्तींच्या वागणुकीचे किस्से घडत असतात तर काही ठिकाणी प्राणांच्या वागणुकीचे किस्से घडत असतात. अशाच प्रकारचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक हत्ती (Elephant) माणसाची नक्कल करताना दिसून येत आहे. यामध्ये कुणी व्यक्ती डान्स कारात असेल तर हा हत्ती डान्स करताना दिसत आहे. जर कुणी उडी मारली तयार तो आपले सामोरील दोन्ही पाय वर करून उडी मारण्याचा प्रयत्न करतो.
या व्हिडिओमध्ये (Video) आपण पाहू शकतो आपण पाहू शकतो की, या फार्महाऊसमध्ये अनेक हत्ती(Elephant) आहेत. यामध्ये पर्यटक एका हत्तीकडे जाऊन त्याच्यासमोर डान्स(Dance) करतो. यामुळे हा हत्तीदेखील आपले कान आणि डोके हलवून डान्स करतो. यानंतर अनेक पर्यटक या हत्तींबरोबर विविध नकला करतात. हे हत्ती या नकला हुबेहूब करून दाखवत असल्यानं पर्यटकांना देखील आश्चर्य वाटत आहे. हा व्हिडीओ याशर अली नावाच्या व्यक्तीने आपल्या ट्विटर(Twitter) अकाउंटवरून शेअर केला आहे. यानंतर हा व्हिडीओ वेगाने व्हायरल झाला असून यावर विविध प्रतिक्रिया देखील येत आहेत.
9. This is from a recent visit to Adventures with Elephants by this couple @TheGlobalExpats.
The elephants have to perform tricks for tourists and have photos taken with them in places elephants don't normally allow humans to stand. Real sanctuaries don't allow this. pic.twitter.com/OlznrCQYHM — Yashar Ali 🐘 (@yashar) January 4, 2021
1. This is horrible...
A South African woman named Emma Rogers went to an abusive, exploitative elephant park in SA called "Adventures with Elephants" and was allowed to do pull-ups on an elephant's tusks Emma's IG: https://t.co/4sWitPOoiG Adventures IG: https://t.co/0McBO3MCHT pic.twitter.com/C0tcTK77OQ — Yashar Ali 🐘 (@yashar) January 4, 2021
हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत असून आतापर्यंत 24 हजार 500 वेळा पहिला गेला आहे. याचबरोबर याला 97 लाईक्स आणि 26 जणांनी रिट्विट देखील केलं आहे. याचबरोबर विविध युजर्स यावर प्रतिक्रिया देत असून हत्तीच्या नकलांचे कौतुक देखील करत आहे. याशर अली यांनी हा व्हिडीओ पोस्ट करत या जोडप्याने नुकतीच ही ऍडव्हेंचर यात्रा केली आहे. यामध्ये या पर्यटकांसाठी हत्तीने विविध नकला केल्या. याचबरोबर त्यांच्याबरोबर फोटो देखील काढले. परंतु हत्ती माणसाला आपल्याजवळ उभे देखील राहून देत नाही अशा परिस्थितीत त्यांनी फोटो काढले आहेत. कोणत्याही अभयारण्यात अशाप्रकारे केले जात नाही. त्यामुळे हे चुकीचे असल्याचे त्याने म्हटले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.