Home /News /news /

हिम्मतवाला! अपघातात एक पाय जाऊनही हत्तीनं मानली नाही हार, पाहा VIDEO

हिम्मतवाला! अपघातात एक पाय जाऊनही हत्तीनं मानली नाही हार, पाहा VIDEO

अनेक युझर्स इमोशनलही झाले तर काहींनी या हत्तीकडून प्रेरणा घेण्याचं आवाहनही केलं आहे.

    मुंबई, 17 जुलै: एखादं छोटं संकट आलं की आपण लगेच हार मानून टोकाचं पाऊल उचलतो किंवा मानसिक ताण येतो मात्र सोशल मीडियावर हत्तीचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हिंम्मत न हरता धैर्य आणि प्रेरणा देणारा हा व्हिडीओ युझर्सनी तुफान पसंत केला आहे. हत्तींचे जलक्रीडा, खाताना किंवा खेळताना अगदी त्यांच्यातील भांडणाचे व्हिडीओही सोशल मीडियावर गेल्या काही दिवसात पाहायला मिळाले मात्र हा व्हिडीओ त्यापेक्षाही खास आणि वेगळा आहे. हा व्हिडिओ बॉलिवूडचे दिग्दर्शक मधुर भंडारकर यांनी शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता हत्तीला एक पाय नाहीय. त्याला बनावट पायाचा आधार देऊन चालण्याचा प्रयत्न केला जात आहे. या हत्तीनं आपली जगण्याची आणि हरण्याची उमेद सोडली नाही त्यामुळे संयम राखून तोही या पायाचा आधार घेऊन हळूहळू चालताना दिसत आहे. हे वाचा-या बाळाला खरंच आहे तिसरा डोळा? वाचा या VIRAL VIDEO मागचे सत्य दिग्दर्शक मधुर भंडारकर यांनी हत्तीच्या जिद्दीचं कौतुक केलं आहे. एका अपघातादरम्यान हत्तीच्या पायाला दुखापत झाल्यामुळे तो कापावा लागला होता. तीन पायावर हत्ती उभा राहू शकत नाही म्हणून त्याला कृत्रिम पाय बसवण्यात आला. या कृत्रिम पायाच्या सहाय्यानं हत्ती चालण्याचा प्रयत्न करत आहे. या व्हिडीओला 3,800 हून अधिक लोकांनी पसंत केलं असून 330 हून अधिक युझर्सनी कमेंट्स केल्या आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेक युझर्स इमोशनलही झाले तर काहींनी या हत्तीकडून प्रेरणा घेण्याचं आवाहनही केलं आहे. संपादन - क्रांती कानेटकर
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Viral video.

    पुढील बातम्या