सात दिवसांत वीज बिल भरा नाहीतर कनेक्शन कापणार,बावनकुळेंचा फतवा

सात दिवसांत वीज बिल भरा नाहीतर कनेक्शन कापणार,बावनकुळेंचा फतवा

"ज्यांचं जास्त वीज बिल थकीत आहे, त्यांनी मुख्यमंत्री कृषीसंजीवनी योजनेत सहभागी व्हावं आणि हप्त्याहप्त्यात वीज बिल भरावं"

  • Share this:

30 आॅक्टोबर : सात दिवसांत चालू वीज बिल भरा नाहीतर वीज कनेक्शन तोडण्यात येईल असा फतवा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढलाय.

राज्यातल्या 41 लाख शेतकऱ्यांकडे 19 हजार कोटी रुपयांची वीज बिल थकबाकी आहे. गेल्या तीन वर्षांत सरकारनं शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीज कापली नाही. पण आता महावितरणला थकबाकी झेपत नसल्यानं येत्या सात दिवसांत किमान चालू बिल भरा नाहीतर वीज कापण्याचा इशारा देण्यात आलाय.

ज्यांचं जास्त वीज बिल थकीत आहे, त्यांनी मुख्यमंत्री कृषीसंजीवनी योजनेत सहभागी व्हावं आणि हप्त्याहप्त्यात वीज बिल भरावं असं आवाहनही त्यांनी केलंय.

बावनकुळे काहीही सांगत असले तरी राज्यातल्या शेतकऱ्याची सात दिवसांत चालू वीज बिल भरण्याची क्षमता आहे का असा सवाल विचारण्यात येतोय.

First published: October 30, 2017, 7:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading