वीजबिल संदर्भात बैठक संपली, राज्यातील ग्राहकांना मिळणार मोठा दिलासा

वीजबिल संदर्भात बैठक संपली, राज्यातील ग्राहकांना मिळणार मोठा दिलासा

एकूण वीजबिल ग्राहकापैंकी 73 टक्के ग्राहक घरगुती वापर करतात. वीजबिल संदर्भात सूट देण्याबाबत आज चर्चा केली आहे

  • Share this:

मुंबई, 29 जुलै : लॉकडाउनच्या काळात सर्वसामन्यांना वीज बिल दरवाढीचा झटका बसला आहे. या प्रकरणी राज्यभरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आज कॅबिनेटची महत्त्वाची बैठक पार पडली. लवकरच  वीजबिल दरवाढ सवलतीचा प्रस्ताव आणला जाणार आहे.

या नवीन प्रस्तावामध्ये  साधारणपणे 20 ते 30 टक्के वीजबिलात सूट दिली जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा समजला जाता आहे. याबद्दलचा प्रस्ताव एमईआरसीकडे राज्य सरकार देणार आहे. एमईआरसी या बाबत अंतिम निर्णय घेईल आणि त्यानंतर राज्य सरकारकडून याची घोषणा होईल.

बापाच्याच चारित्र्यावर संशय,मुलाने तलवारीने वार करून संपवले नंतर जाळला मृतदेह

जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर राज्यातील सर्व ग्राहकांना वाढीव वीज बिलात 20 ते 30 टक्के सूट मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील  93 टक्के वीज ग्राहकांना याचा फायदा होईल, अशी माहिती ऊर्जा खात्यातील सूत्रांनी दिली आहे. राज्यात एकूण 73 लाख घरगुती वीज ग्राहक आहे. वीजबिल सवलत देताना जानेवारी ते मार्च कालावधीत वीजबिल याचा सरासरी किती आले याचा विचार केला जाणार आहे.

एकूण वीजबिल ग्राहकापैंकी 73 टक्के ग्राहक घरगुती वापर करतात.  वीजबिल संदर्भात सूट देण्याबाबत आज चर्चा केली आहे. एमईआरसीला वीज बिलात सूट द्यावी अशी विनंती केली आहे, असं ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सांगितले आहे.

वाह! यंदाही मुलांपेक्षा मुलीच हुश्शार, कोकण विभागाचा निकाल सर्वात जास्त

'घरगुती वीजबिल सवलत निर्णय पुढच्या कॅबिनेट आणला जाईल. एमईआरसी अधिकारी परदेशात आहे. त्यामुळे पुढील कॅबिनेट प्रस्ताव आणला जाईल' असंही राऊत यांनी सांगितले.

'आर्थिक अडचण आलेल्या ग्राहक दिलासा असेल. जवळपास 93 टक्के ग्राहकांना दिलासा दिला जाईल, असा निर्णय घेण्यात येणार आहे. पण  नेमकी किती टक्के सवलत हे एमईआरसी ठरवते त्यामुळे त्याची घोषणा आधी करता येणार  नाही' असंही राऊत यांनी सांगितलं.

तर, 'वाढीव बिलं कशी आली याबाबत आजच्या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे. एक प्रस्ताव एमईआरसीला पाठवला जाईल.  त्याला कॅबिनेटची मंजुरी मिळाल्यावर अंतीम दिलासा दिला जाईल. राज्यातील सर्व ग्राहकांना दिलासा द्यायचा आमचा पूर्ण प्रयत्न आहे', असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं.

Published by: sachin Salve
First published: July 29, 2020, 12:24 PM IST

ताज्या बातम्या