संपाचं त्रिकुट! वीज, बेस्ट आणि बँक खात्यातील कर्मचारी संपावर, नागरिकांना फटका

संपाचं त्रिकुट! वीज, बेस्ट आणि बँक खात्यातील कर्मचारी संपावर, नागरिकांना फटका

वीज, बँक आणि बेस्टचे कर्मचारी संपावर जाणार आहे. त्यामुळे याचा मोठा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे.

  • Share this:

मुंबई, 07 जानेवारी : वीज, बँक आणि बेस्टचे कर्मचारी संपावर जाणार आहे. त्यामुळे याचा मोठा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे. खासगीकरणाच्या विरोधासह वीज कर्मचारी 72 तासांच्या संपावर गेले आहेत. तर मुंबईची लाईफलाईन असलेल्या बेस्टमध्ये सुधारित वेतन करार, सानुग्रह अनुदान आदी मुद्द्यांवर बेस्ट कर्मचारी आज मध्यरात्रीपासून संपावर जाणार आहेत. तर बँक कर्मचारी उद्या आणि परवा संपावर जाणार आहेत.

शासकीय वीज कंपन्यांच्या खासगीकरणाला विरोधासह विविध मागण्यांसाठी महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषणचे राज्यभरातील कर्मचारी आजपासून संपावर गेले आहेत. 3 कंपन्यांचे तब्बल ८३ हजार कर्मचारी ७२ तास संपावर असणार आहेत.

हे कर्मचारी संपावर गेल्यामुळे राज्यातील वीज निर्मिती आणि वितरण ठप्प होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र स्टेट इलेक्‍ट्रिसिटी वर्कस फेडरेशन, सबॉर्डीनेट इंजिनियर्स असोसिएशन, वीज कामगार युनियन संपात सहभागी झाले आहेत.

हेही वाचा : या ५ खेळाडूंमुळे भारताने ऑस्ट्रेलियात मिळवला ऐतिहासिक विजय

तर दुसरीकडे, मुंबईची लाईफलाईन असलेल्या बेस्टसेवेचे कर्मचारी आज मध्यरात्रीपासून संपावर जाणार आहेत. सुधारित वेतन करार, सानुग्रह अनुदान, बेस्टचे महापालिकेत विलीनीकरण आदी मागण्यांसाठी मध्यरात्रीपासून संपावर जाण्याची हाक बेस्ट कामगार संघटनांनी दिली आहे.

शिवसेनेने या संपाला पाठिंबा दिल्यामुळे बेस्टची बससेवा ठप्प होण्याची दाट शक्‍यता आहे. वाटाघाटीसाठी बेस्ट प्रशासनाने कृती समितीच्या शिष्टमंडळाला दुपारी 3 वाजता बैठकीसाठी बोलावलं आहे.  त्यामुळे प्रशासन आणि कामगार संघटनांमध्ये आज होणाऱ्या बैठकीवर संपाचे भवितव्य अवलंबून आहे.

तर सरकारच्या कामगार विरोधी योजनांविरोधात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी 8 आणि 9 म्हणजेच मंगळवार आणि बुधवारी संप पुकारला आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळं देशातील बँकांच्या व्यवहारास फटका बसणार आहे.

देशातील 10 केंद्रीय कामगार संघटनांनी पुन्हा बँक बंदची हाक दिली आहे. त्यामुळं तुमची बँकेतील महत्त्वाची कामं आजच करून घ्या, कारण संपामुळे काही प्रमाणात कामकाज ठप्प होऊ शकतं.

VIDEO : लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता केव्हा लागणार हे दानवेंनी आत्ताच सांगितलं टाकून!

First published: January 7, 2019, 10:50 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading