रेल्वे तिकीट, बोर्डिंग पासवर मोदींचा फोटो, निवडणूक आयोगानं बजावली नोटीस

रेल्वे तिकीट, बोर्डिंग पासवर मोदींचा फोटो, निवडणूक आयोगानं बजावली नोटीस

निवडणूक आयोगानं रेल्वे मंत्रालय आणि नागरी उड्डाण मंत्रालयाला नोटीस बजावली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 2 एप्रिल : निवडणूक आयोगानं रेल्वे मंत्रालय आणि नागरी उड्डाण मंत्रालयाला नोटीस बजावली आहे. रेल्वेमध्ये विक्री करण्यात येणाऱ्या चहाच्या कपवरील 'मैं भी चौकीदार' तसंच रेल्वे आणि विमानाच्या बोर्डिंग पासवर पंतप्रधान मोदींचा फोटो हटवण्यात न आल्याप्रकरणी निवडणूक आयोगाकडून नोटीस धाडण्यात आली आहे. 'आचारसंहिता लागू झाल्यानंतरही आतापर्यंत रेल्वे तिकीट तसंच बोर्डिंग पासवरील मोदींचा फोटो का हटवण्यात आला नाही?' अशी विचारणा निवडणूक आयोगानं दोन्ही मंत्रालयांना केली आहे. एअर इंडिया आणि रेल्वेच्या तिकिटांवर छापण्यात आलेला पंतप्रधान मोदींचा फोटो म्हणजे आचारसंहितेचं उल्लंघन असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.

दरम्यान, दिल्लीहून काठगोदामकडे जाणाऱ्या शताब्दी एक्स्प्रेसमध्ये 'मैं भी चौकीदार' लिहिलेल्या कपातून चहाची विक्री केल्याप्रकरणी Chief Supervisor विरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर 'मैं भी चौकीदार' लिहिलेल्या कपचा फोटो प्रचंड व्हायरल झाला होा. यावर काही जणांनी आक्षेप नोंदवला. याप्रकरणाचा तपास सुरू असल्याचं ट्विटदेखील रेल्वेकडून करण्यात आलं होतं. यानंतर आता कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसच्या 'चौकीदार चोर है' या नारेबाजीविरोधात भाजपनं 'मैं भी चौकीदार' अशी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेनुसार भाजपच्या बहुतांश नेतेमंडळींनी सोशल मीडियावर आपल्या नावापुढे चौकीदार हा शब्द जोडला आहे.

मावळ लोकसभा : शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणेंच्या अडचणींत वाढ

VIDEO : 'नवरा बदलण्याइतकं संविधान बदलणं सोप नाही', स्मृती इराणींबद्दल वादग्रस्त वक्तव्य

VIDEO : 'माझा मुलगा 24-25 वर्षांचा नाही, त्याला भाषणही करता येतं', विखेंचा पवारांना टोला

VIDEO : रावसाहेब दानवे पुन्हा चुकले! विंग कमांडर अभिनंदनबद्दल केलं 'हे' वक्तव्य

 

First published: April 2, 2019, 9:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading