राहुल गांधींच्या अमेठीतील उमेदवारी अर्जावर आक्षेप, निवडणूक आयोगाने दिला निर्णय

राहुल गांधींच्या अमेठीतील उमेदवारी अर्जावर आक्षेप, निवडणूक आयोगाने दिला निर्णय

निवडणूक आयोगानं राहुल गांधी यांना मोठा दिलासा दिला आहे.

  • Share this:

अमेठी, 22 एप्रिल : काँग्रसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची अमेठीमधील उमेदवारी निवडणूक आयोगानं वैध ठरवली आहे. अपक्ष उमेदवारानं राहुल गांधी यांचं नाव, संपत्ती आणि नागरिकता या मुद्यावर आक्षेप घेतला होता. तयामुळे अमेठीसंदर्भात काय निर्णय होणार याकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं होतं. पण, निवडणूक आयोगानं राहुल गांधी यांची उमेदवारी वैध ठरवली आहे. त्यामुळे काँग्रेसला हा मोठा दिलासा मिळाला आहे. उत्तर प्रदेशातील अमेठीसह राहुल गांधी हे केरळमधील वायनाडमधून देखील लोकसभा निवडणूक लढवत आहेत. दरम्यान, केरळ हा डाव्यांचा गड म्हणून ओळखला जातो. त्या ठिकाणाहून निवडणूक लढताना राहुल गांधी यांना डाव्यांशी राजकीय वैर नसल्याचं यापूर्वी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, राहुल गांधी यांना स्मृती इराणी यांनी अमेठीतून आव्हान दिलं आहे.

काय म्हटलं होतं तक्रारीमध्ये

अमेठीमधील जिल्हाधिकारी कार्यालयात अपक्ष उमेदवार ध्रुवलाल आणि बहुजन मुक्ती पक्षाचे उमेदवार अफजल वारिस यांनी राहुल गांधींच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेत त्यांचा अर्ज रद्द करण्याची मागणी केली.  ध्रुवलाल आणि वारिस यांनी घेतलेल्या आक्षेपानुसार राहुल गांधी यांनी अर्जावर जो स्टॅम्प लावला आहे तो दिल्लीचा आहे. प्रत्यक्षात तो अमेठीचा असला पाहिजे. तसेच राहुल गांधी यांनी शैक्षणिक पात्रतेबाबत हेरफेर आणि प्रतिज्ञापत्रात संपत्तीची माहिती दिली नसल्याचा आरोप ध्रुवलाल यांनी केला.

ध्रुवलाल आणि वारिस यांनी राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्याची मागणी केली होती. राहुल गांधी यांनी भरलेल्या उमेदवारी अर्जात शैक्षणित पात्रतेबाबत पूर्ण माहिती दिली नाही. हा एक प्रकारचा धोका असल्याचे वारिस यांच्या वकिलांनी म्हटले होतं. इतक नव्हे तर प्रतिज्ञापत्रात स्थिर संपत्तीबाबतचा रकाना रिकामा सोडला आहे. राहुल यांनी एका कंपनीची नोंदणी करताना स्वत:ला ब्रिटनचे नागरिक असल्याचे म्हटले होते. त्यामुळे ते भारतीय नागरिक नाहीत, असा दावा ध्रुवलाल यांनी केला होती. राहुल गांधी यांनी खोटी कागदपत्रे सादर करुन निवडणूक अधिकाऱ्यांची दिशाभूल केल्याचे ध्रुवलाल यांनी म्हटले होतं.

VIDEO: प्रचाराच्या शेवटच्या दिवशी 2 पक्षांचे कार्यकर्ते भिडले

First published: April 22, 2019, 1:11 PM IST

ताज्या बातम्या