ईव्हीएम मशीन हॅक करून दाखवाच, निवडणूक आयोगाचं खुलं आव्हान

ईव्हीएम मशीन हॅक करून दाखवाच, निवडणूक आयोगाचं खुलं आव्हान

"जर तुम्हाला ईव्हीएम मशीनवर संशय असेल तर ती हॅक करून दाखवा. यासाठी तुम्हाला चार तासांचा वेळ दिला जाईल. "

  • Share this:

20 मे : निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना ईव्हीएम मशीन हॅक करून दाखवाच असं थेट आव्हान दिलंय. आयोगाने सर्व राजकीय पक्षांना 3 जूनपासून ईव्हीएम मशीन हॅक करून दाखवू शकतात असंही जाहीर केलंय.

पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपच्या यशानंतर सपा, बसपा आणि आपने ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार केल्याचा आरोप केला. एवढंच नाहीतर मध्यंतरी आपने ईव्हीएम मशीन हॅक करता येतं असं डेमोसह निदर्शनास आणून दिलं.

या सर्व घडामोडीनंतर पुन्हा एकदा निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना जाहीर आव्हान दिलंय. आज (शनिवारी) निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत डेमो दाखवून ईव्हीएम मशीन हॅक करता येणार नाही असं ठणकावून सांगितलं.  जर तुम्हाला ईव्हीएम मशीनवर संशय असेल तर ती हॅक करून दाखवा. यासाठी तुम्हाला चार तासांचा वेळ दिला जाईल. या चार तासांत तुम्ही मशीन हॅक करून दाखवा असं जाहीर आव्हानच आयोगाने राजकीय पक्षांना दिलं.

विशेष म्हणजे, मुख्य निवडणूक आयुक्त नसीम जैदी यांनी 12 मे रोजी याच मुद्द्यावर राजकीय पक्षांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीनंतर राजकीय पक्षांना त्यांचे आरोप सिद्ध करण्यासाठी संधी दिली जाईल. अखेर आज आयोगाने देशातील सर्व सात राष्ट्रीय पक्ष आणि 48 राज्य स्तरीय पक्षांना खुलं आव्हान दिलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 20, 2017 05:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading