दिल्लीतील 'आप'चे 20 आमदार निवडणूक आयोगाकडून अपात्र घोषित !

दिल्लीतील 'आप'चे 20 आमदार निवडणूक आयोगाकडून अपात्र घोषित !

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला मोठा झटका बसला आहे. निवडणूक आयोगाने शुक्रवारी लाभाचे पद बाळगल्या प्रकरणी आपच्या 20 आमदारांना अपात्र घोषित केलंय. या आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी निवडणूक आयोगाने राष्ट्रपतींकडे शिफारस केली आहे.

  • Share this:

19जानेवारी, नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला मोठा झटका बसला आहे. निवडणूक आयोगाने शुक्रवारी लाभाचे पद बाळगल्या प्रकरणी आपच्या 20 आमदारांना अपात्र घोषित केलंय. या आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी निवडणूक आयोगाने राष्ट्रपतींकडे शिफारस केली आहे.

निवडणूक आयोगाच्या या निर्णयांमुळे दिल्लीमध्ये 20 जागांवर पोटनिवडणूक होऊ शकते. दोन वर्षांपूर्वी दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपचा विजय झाल्यापासून आप आमदारांच्या लाभाच्या पदाच्या मुद्यावरुन वाद सुरु झाला होता. दिल्लीतील वकिल प्रशांत पटेल यांनी या आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी याचिका दाखल केली होती.

निवडणूक आयोगाने आपचे 20 आमदार अपात्र ठरवल्याने, केजरीवालांचं सरकार अल्पमतात आल्याचा आरोप करत भाजपने दिल्लीत केजरीवालांचं सरकार बरखास्त करण्याची मागणी केलीय.

आम आदमी पार्टीने या 20 आमदारांना संसदिय सचिव पदी निुयक्त केलं होतं. पण हे पद लाभाचं असल्याचा आरोप करत याचिकाकर्त्यांने आयोगाकडे तक्रार केली होती. त्यावर आयोगाने ही तक्रार ग्राह्य धरत या 20 आमदारांना अपात्र घोषित केलंय तर आपने संसदिय सचिव हे पद आर्थिक लाभाचं नसल्याचं सांगत हा आयोगाचा निर्णय चुकीचा असल्याचं म्हटलंय.

काय आहे प्रकरण ?

आप पार्टीच्या दिल्ली सरकारने मार्च २०१५ मध्ये २१ आमदारांना सांसदीय सचिव पदावर नियुक्त केले होते. हे लाभाचं पद असल्याचे सांगत प्रशांत पटेल नावाच्या वकीलाने राष्ट्रपतीकडे तक्रार केली होती. पटेल यांनी या आमदारांची सदस्यता रद्द करण्याची मागणी केली होती. दरम्यान, आमदार जनरल सिंह यांनी गेल्यावर्षी पदाचा राजीनामा दिल्याने या प्रकरणात अडकलेल्या सदस्यांची संख्या २० झाली आहे.

दरम्यान, जर समजा आपचे 20 आमदार अपात्र ठरले तरी केजरीवालांचं सरकार अल्पमतात येणार नाहीये कारण दिल्लीत केजरीवालांना बहुमतासाठीचा आकडा फक्त 36 आहे तर आपकडे 20 आमदारांचं निलंबन होऊन ही 45 आमदारांचं संख्याबळ असणार आहे.

दिल्ली विधानसभेचं पक्षीय बलाबल

एकूण जागा - 70 (बहुमताचा आकडा 36)

आम आदमी पक्ष - 66-1 =65 (जनरल सिंह यांचा राजीनामा)

भाजप - 04

काँग्रेस -00

First published: January 19, 2018, 2:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading