एका क्लिकवर अशी कळेल मतदार केंद्राची माहिती; अशी मिळवा ऑनलाईन वोटिंग स्लिप

एका क्लिकवर अशी कळेल मतदार केंद्राची माहिती; अशी मिळवा ऑनलाईन वोटिंग स्लिप

मतदान केंद्र कुठलं, मतदार ओळखपत्र क्रमांक यांची माहितीसुद्धा एका क्लिकवर बघण्याची सोय या अधिकृत वेबसाईटवर मिळू शकते.

  • Share this:

मुंबई, 23 एप्रिल : लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाचा तिसरा टप्पा मंगळवारी आहे. मतदारयादीत आपलं नाव आहे का याची माहिती घरबसल्या मिळू शकते. एवढंच नाही, तर मतदान केंद्र कुठलं, मतदार ओळखपत्र क्रमांक यांची माहितीसुद्धा एका क्लिकवर बघण्याची सोय या अधिकृत वेबसाईटवर मिळू शकते.

कसं शोधायचं मतदार यादीतलं नाव?

आपला मतदार ओळखपत्र क्रमांक, मतदान केंद्र, मतदार क्रमांक याची माहिती http://www.nvsp.in या शासकीय संकेतस्थळावर मिळू शकते. तुमचं नाव आणि जन्मतारीख, जिल्हा आणि मतदारसंघ ही माहिती दिलेल्या पद्धतीने नोंदवली की तुमच्या मतदान केंद्राविषयी सगळी माहिती समोर येते. या वेबसाईटवर तुमची मतदानासाठी उपयोग पडणारी वोटिंग स्लिपसुद्धा PDF फॉरमॅटमध्ये उपलब्ध होऊ शकते. . फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशाच्या सर्व राज्यांतील माहिती एका क्लिकवर इथे मिळेल.

महाराष्ट्रातल्या 14 मतदारसंघात मतदान होत आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातले काही मतदारसंघ यामध्ये आहेत.  देशभरातल्या 115 लोकसभेच्या जागांसाठी या टप्प्यात मतदान होणार आहे. हा सर्वांधिक मतदारसंघात मतदान होणारा मोठा टप्पा आहे.

देशभरात 7 टप्प्यांमध्ये मतदान होत आहे. त्यापैकी महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक एकूण 4 टप्प्यात होत आहे. राज्यात तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान सुरू झालं. महाराष्ट्रातला शेवटचा टप्पा 29 एप्रिलला होणार आहे.

VIDEO: मतदान केल्याचा पुरावा दाखवा, एकावर एक मिसळ फ्री मिळवा!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 23, 2019 03:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading